कृषिमंत्री ही बीड जिल्ह्याचे, बियाण्या असोसिएशनचे अध्यक्षही बीड जिल्ह्याचे तरीही कपाशीचे बियाणे 1100 रुपयाला
गेवराई (रिपोर्टर) कृषीमंत्री धनंजय मुंडेंच्या जिल्ह्यात जिल्हा बियाणाचा काळाबाजार कृषी विभागातील अधिकारी ठोक बियाणे विक्रेते यांच्या देवाणघेवाणीतून शेतकर्यांना सर्रास कपाशीची बियाणे 864 रुपये किमतीचे पॅकेट 1100 रुपयाला विकण्याचा घाट घालत आहेत त्यामुळे शेतकर्यांनी 864 रुपयाच्या चठझ वरच बियाणे खरेदी करावे असे आवाहन गेवराई तालुका काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेश बेदरे यांनी केली आहे.
नुकतेच काल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जिल्ह्यातील दुष्काळ दृश्य भागाची पाहणी केली यावेळी शेतकर्यांनी कपाशी बियाणे चड्या भावाने खरेदी करावे लागत असल्याचे व्यथा सांगितली त्यावर कृषी मंत्र्यांना दूरध्वनीवरून कॉल केला असता त्यांचा मोबाईल नॉट रिचेबल होता. जिल्ह्यातील शेतकर्यावर अस्मानी संकट असताना राज्याचे कृषिमंत्री विदेश दौर्यावर आहे जिल्ह्यातील शेतकरी पावसाची वाट पाहत असून पेरणीसाठी बियाणे खरेदीची लगबग करत आहेत परंतु जिल्ह्यात शेतकर्याला बियाणे अव्वाचे सव्वा भावात खरेदी करण्याची वेळ आली आहे.
खरीप हंगाम पेरणीच्या तोंडावर शेतकर्यांची आर्थिक लूट करण्यासाठी बीड मधील काही मुख्य बी बियाणे विक्रेते कृषी विभागातील अधिकार्यांना सोबत घेऊन बियाणांचा काळाबाजार करत आहे. विशेष म्हणजे बियाणे विक्रेते असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष ही बीडचेच आहेत राज्याचे कृषिमंत्री ही बीडचे आहेत तरीसुद्धा ठोक कृषी विक्रेते तालुक्यातील छोट्या मोठ्या कृषी दुकानदारांना हाताशी धरून बियाण्यांचा काळाबाजार करत आहेत कापसाच्या ठराविक बियाणांची ठोक विक्रेते कुत्रीम टंचाई निर्माण करून शेतकर्यांच्या मानसिकतेचा फायदा घेतला जात आहे. कापूस लागवडीसाठी सर्वच बियाणे योग्य आहेत परंतु शेतकर्यांना काही ठराविक बियाणावर विश्वास असल्याने त्याचा गैरफायदा कृषी दुकानदार घेत असल्याचे दिसून आले आहे काही ठराविक कापसाच्या बियाणांची मूळ किंमत 864 रुपये असताना शेतकर्यांकडून कृषी विक्रेते 1150 ज्यादा घेऊन ही बियाणे विक्री करतात जिल्ह्यातील काही दुकानदाराकडे बियाणे विक्रीचे परवानेही नाहीत तरी पण ते कृषी दुकाने थाटून शेतकर्यांची लूट करत असल्याचे निदर्शनास आले आहे इतकंच नव्हे तर जिल्ह्यातील विक्रेत्यांच्या नावे बियाण्यांचे पाकीटे टाकून इतर जिल्ह्यात त्या बियाण्यांची जादा भावाने विक्री करत असताना शेतकर्याची कुचुंबना होत आहे यासाठी शेतकर्यांनी बियाण्याची खरेदी करताना एमआरपी शिवाय बियाणे खरेदी करू नये व हा बियाण्याचा काळा बाजार मांडलेल्या ठोकविक्रेत्यांना जिल्हा राज्याचे कृषिमंत्री जाब विचारणार आहेत की नाही असा प्रश्न जिल्ह्यातील शेतकर्यांना पडला आहे हा काळाबाजार रोखायचा असेल तर कंपन्यांनी ज्या ठोक त्यांना बियाण्याचे पॅकेट वाटप केले आहेत व त्या ठोक्रेत्यांनी ज्या किरकोळ कृषी विक्रेत्यांना बियाण्यांची पॅकेट वाटप केले आहेत त्याच्या संकेसह प्रसिद्धी माध्यमाला जाहीर करावी याचा फायदा होईल असे आवहान काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेश बेदरे यांनी केले आहे.