** राज्यातील हा पहिल्याच निर्णय ; मासिक सभा न घेण अंगलट आले तर मनमानी कारभार दाखविला **
वडवणी (रिपोर्टर):- सरपंच पदावर विराजमान झाल्या नंतर वर्षभरात एक हि ग्राम सभा न घेणे, शासकिय कागदपत्रावर सदस्यांना विचारात न घेत स्वाक्षऱ्या करणे तसेच कोरम पुर्ण न करत मनमानी कारभार केल्या प्रकरणी ग्रा.प.सदस्यांनीच लोकनियुक्त सरपंच असणाऱ्या महिलेची तक्रार केली होती आणि याच तक्रारीवरुन पुसरा गांवच्या महिला सरपंच यांना विभागीय आयुक्तांनी अपात्र म्हणून घोषित केले आहे. तर लोकनियुक्त सरपंच पदाला अघोषित करण्याची हि राज्यातील पहिलीच घटना आहे. या कार्यावाहीमुळे एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत आधिक माहिती अशी कि, वडवणी तालुक्यातील पुसरा गांवची ग्रामपंचायत निवडणुक हि साधारण डिसेंबर २०२२ झाली. यावेळी लोकनियुक्त सरपंच म्हणून श्रीमती कांताबाई रामराव सावंत यांची निवड झाली होती. ह्या पदावर येताच दि.१ जाने.२०२३ ते डिसेंबर २०२३ च्या कालवधीत त्यांनी एक हि मासिक सभा घेतली नाही, ग्रा.प. सदस्यांनी वारंवार सांगून देखील सभा घेतली नाही. तसेच मुद्दाहून टाळाटळ केली. कोणत्याच सदस्यांना विचारत न घेता ग्रा.प.शासकिय कागदोपत्री स्वाक्षऱ्या करणे व कोरम पुर्ण न करताच ग्रामसभा घेतल्या असे कागदोपत्री दाखवून मनमानी करणे यांची ग्रा.प. सदस्य सौ. मिरा बळीराम नाईकवाडे, वंदना रामचंद्र शेळके, राहीबाई चिंतामण नागरगोजे, संगिता अरुण मुजमुले, राधा बंडू मुजमुले, गोरक्षनाथ रामप्रसाद नाईकवाडे यांनी याबाबत तक्रार केली होती. आणि याच तक्रारीवर पंचायत समिती वडवणीचे बिडिओ, जि.प. बीडचे सिओ यांच्या समोर या संदर्भातील सुनावण्या झाल्या होत्या. यामध्ये लोकनियुक्त महिला सरपंच आणि ग्रामसेवक दोषी असल्याचे आढळून आले आहे. यामध्ये तात्कालीन ग्रामसेवक बी.एन भुजबळ यांना दि. २७ मे २०२४ रोजी निलंबीत करण्यात आले आहे. तर या प्रकरणाची सुनवणी विभागीय आयुक्त यांच्या समोर दि.३ डिसेंबर २०२४ रोजी ठेवण्यात आली होती. यामध्ये सरपंच महिलेनी वकिला मार्फत वेळ देण्यात यावा अशी मागणी केली होती. यावर आयुक्तानी ३१ डिसेंबर २०२४ रोजी अंतिम सुनावणी ठेवली होती. यावेळी लोकनियुक्त महिला सरपंच वरील प्रमाणे कामकाज करत असल्याचे प्रामुख्याने दिसून आले आहे. श्रीमती कांताबाई रामराव सावंत सरपंच मौजे पुसरा ता.वडवणी जि.बीड यांना ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ३९(१) मधील तरतुदीनुसार सांप्रत कालवधी करिता सरपंच कांताबाई सावंत यांना अपात्र घोषित घोषित करण्यात आले असल्याचे विभागीय आयुक्त यांच्या स्वाक्षरीने दि.४ फेब्रुवारी २०२५ रोजी पत्र काढले आहे. तर हा निर्णय राज्यातील पाहिलाच असल्याने लोकनियुक्त सरपंच असणाऱ्या आणि मनमानी कारभार करणाऱ्या सरपंच विरोधात सदस्यांनी तक्रार केली तर सरपंच महोदयांना घरचा रस्ता दाखविला जावू शकतो. या निकालाने एकच खळबळ उडाली आहे.
“””””””””””””””” चौकट घेणे “””””””””””
** नऊ पैकी सहा विरोधात **
पुसरा ग्रामपंचायत हि एकुण नऊ सदस्य आणि दहावा लोकनियुक्त सरपंच असे दहा जणाची हि ग्रा.प. होती. यातील सहा सदस्यांनी सरपंच यांच्या विरोधात तक्रार दिली होती. हि तक्रार जवळपास वर्षभर चालली यात सरपंच दोषी ठरले आहेत.तर तालुक्यात देखील खळबळ उडाली असून मनमानी कारभार करणाऱ्या सरपंच यांना हा निर्णय चोप देणारा आहे.









