जमियतुल कुरेश संघटनेने घेतला निर्णय
बीड (रिपोर्टर): जनावरांची खरेदी आणि विक्री न करण्याचा निर्णय काल जमियतुल कुरेश समाज संघटनेच्या वतीने घेण्यात आला. जी.एन. फंक्शन हॉल या ठिकाणी बैठक घेण्यात आली. या बैठकीत हा निर्णय एकमुखीने घेण्यात आला.
जनावरांच्या विक्री आणि खरेदीच्या संदर्भात चुकीच्या पद्धतीने कारवाया होत असल्याने जनावरे खरेदी-विक्री न करण्याचा निर्णय संघटनेच्या बैठकीमध्ये घेण्यात आला. 19-7-2025 पासून याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. सदरील संघटनेची बैठक जी.एन. फंक्शन हॉल या ठिकाणी करण्यात आली होती.









