त्रिदल संघटनेच्या वतीने मोटारसायकल तिरंगा रॅली, महाविद्यालयांच्या वतीने तिरंगा रॅली
उपविभागीय अधिकारी कुदळे, तहसिलदार गुंडमवार,पो.नि.सलिम चाऊस सहभागी
घराघरांवर तिरंगा फडकवा -आ.सुरेश धस
आष्टी (रिपोर्टर):-वंदे मातरम्,भारत माता की जय,हर घर तिरंगा,बेन्जो वरती देशभक्ती पर गिताने, विद्यार्थी, प्रत्येक नागरीकांच्या हाती असलेला तिरंगा देशभक्ती मय वातावरणात आ.सुरेश धस यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी च्या वतीने आज दि.11 ऑगस्ट रोजी सकाळी तब्बल 75 मीटर लांब तिरंगा ध्वजाची रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यात महाविद्यालयातील विद्यार्थी, पालक, शिक्षक, राजकीय नेते, भाजपचे पदाधिकारी यांच्यासह तालुक्यातील हजारोंच्या संख्येने नागरिक उत्फूर्त सहभागी झाले होते.आष्टी मतदार संघातील घराघरांवर तिरंगा फडकवा असे आ.सुरेश धस यांनी आवाहन केले,आ.सुरेश धस मित्र मंडळ, भारतीय जनता पार्टी या मोहिमेत अनोख्या पद्धतीने सहभागी झाले आहे. आष्टी शहरातील गणेश महाविद्यालय, पंडित नेहरू महाविद्यालय, हंबर्डे महाविद्यालय,कन्या प्रशाला, महात्मा गांधी महाविद्यालय,सुरुडी आश्रम शाळा,सर्व महाविद्यालयाच्या वतीने तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.या रॅली मध्ये आ.सुरेश धस,उपविभागीय अधिकारी प्रमोद कुदळे , तहसिलदार विनोद गुंडमवार, पोलिस निरीक्षक सलिम चाऊस, गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे,सर्व प्रशासकीय अधिकारी तिरंगा रॅली मध्ये सहभागी झाले होते.
स्वातंत्र्यदिन भव्य पध्दतीने साजरा करण्यात येणार आहे. यासाठी ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ कार्यक्रमाअंतर्गत केंद्र सरकारने ‘हर घर तिरंगा’ या मोहिमेचे आयोजन केले आहे. महाविद्यालयांनी देखील या मोहिमेत भव्यदिव्य पद्धतीने सहभागी होण्याचा निर्धार केला . या अनुषंगाने तब्बल 75 मीटर लांबीच्या तिरंगा ध्वजाची प्रभात फेरी काढण्यात सकाळी पंचायत समितीच्या आवारातून फेरीस सुरुवात झाली. विद्यार्थ्यी नागरीकांनी 75 मीटर लांबीचा झेंडा हातात उचलून धरत गावातून फेरी काढली. या अनोख्या फेरीत ग्रामस्थांनी देखील सहभाग घेतला. भारत माता की जय, हर घर तिरंगा (पान 7 वर)
अशा घोषणांचा जयघोष करत संपूर्ण ही फेरी काढण्यात आली. देशभक्तीची भावना विद्यार्थी आणि नागरिकांमध्ये रुजविण्यासाठी ही रॅली काढण्यात आली होती.बेन्जोवरती देशभक्ती पर गिताने देशभक्ती मय वातावरण निर्माण झाले होते.हजरोंच्या संख्येने नागरिक, विद्यार्थी सहभागी झाले होते.यावेळी त्रिदल संघटनेच्या वतीने संघटनेचे संजय खोटे, पदाधिकारी,तर भाजपच्या पदयात्रेत नगराध्यक्ष, रंगनाथ धोंडे, शैलेश सहस्रबुद्धे, गणेश शिंदे,सतिष धस,नितिन मेहेर,अनिल ढोबळे, भगवानराव सांगळे,परिवंत गायकवाड,केशव बांगर, बाळासाहेब नागरगोजे,हनुमान गायकवाड,संजय गायकवाड,श्रीधर खांडवे,भगवान शिनगिरे, अमोल शिंदे,दत्ता जेवे,अजित घुले,राम धुमाळ,जिया बेग,अक्षय धोंडे, गंगाधर पडोळे, सचिन लोखंडे, सभापती बद्रीनाथ जगताप,संजय आजबे,दिपक निकाळजे, सुनिल सानप, संदीप खाकाळ, सुधिर पठाडे,यशवंत खंडागळे, संतोष मेहेर, आत्माराम फुंदे, संदीप कारंजकर, आदी सह भाजप कार्यकर्ते पदाधिकारी, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील हजारोंच्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.