परळी (रिपोर्टर): माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांच्या हस्ते जलजीवन मिशन अंतर्गत परळी तालुक्यातील 4 गावांच्या पाणी पुरवठा योजनेच्या सुमारे 15 कोटी 40 रुपये किमतीच्या कामाचा शुभारंभ शनिवारी (दि. 01) सायंकाळी 6 वा. रेवली येथे संपन्न होणार आहे.
आ. धनंजय मुंडे हे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री असताना त्यांनी मोठ्या प्रमाणात जलजीवन योजनेतील कामांचा डीपीआर मंजूर केला होता. त्यामुळेच जिल्ह्यातील शेकडो गावांमध्ये घरोघरी नळाद्वारे पाणी पुरवठा करण्याच्या योजनेची काम हाती घेण्यात येत आहे.
परळी तालुक्यातील खालील कामांचा यामध्ये समावेश आहे, त्यात, पोहनेर येथील बंधार्यावरून पाईपलाईन द्वारे रेवली येथे पाणी आणणे (18800 मीटर), रेवली येथे 4 गावांसाठी 1.5 चङढ फिल्टर प्लांट बसवणे3. पाण्याच्या टाक्या बांधकाम, रेवली – 1,17,000 लीटर,गाढे पिंपळगाव – 55,000 लीटर, वाका – 1,20,000 लीटर, कौडगाव (घोडा) – 55,000 लीटर, रेवली फिल्टर प्लांट पासून पाईपलाईन द्वारे चार गावांना पाणी आणणे, रेवली – 6670 मीटर, कौडगाव (घोडा) – 10,580 मीटर, 3. गाढे पिंपळगाव – 8250 मीटर, वाका – 3890 मीटर, गावांतर्गत पाईपलाईन, रेवली – 3175 मीटर,गाढे पिंपळगाव – 1735 मीटर, वाका – 1735 मीटर, कौडगाव (घोडा) – 4338 मीटर त्याचबरोबर रेवली फिल्टर प्लांट पासून चारही गावांसाठी मोटर व सोलर सिस्टीम बसवणे अशा एकूण 15 कोटी 40 लाख रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेतील कामांचा भूमीपूजन सोहळा आ. धनंजय मुंडे यांच्या हस्ते संपन्न होणार असून या कार्यक्रमास राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अजय मुंडे, ज्येष्ठ नेते वाल्मिक अण्णा कराड, रा.कॉ.चे तालुकाध्यक्ष लक्ष्मणराव पौळ, भाऊसाहेब नायबळ, सूर्यभान नाना मुंडे, शरद पाटील राडकर, माऊली तात्या गडदे, राजाभाऊ पौळ, विष्णुपंत देशमुख, प्रभाकर पौळ यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार असून, चारही गावांसह पंचक्रोशीतील नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन रेवली, वाका, गाढेपिंपळगाव, कौडगाव घोडा येथील सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी केले आहे.