Thursday, October 21, 2021
No menu items!
Homeक्राईमदोन वर्षापासून रस्ता अडवला; खांडे पारगावच्या शेतकर्‍याचा आत्मदहनाचा इशारा

दोन वर्षापासून रस्ता अडवला; खांडे पारगावच्या शेतकर्‍याचा आत्मदहनाचा इशारा


बीड (रिपोर्टर):- खांडेपारगाव येथील शेतकरी दामोधर केशव आमटे यांचा शेत रस्ता काका किसन ठोकळ यांनी गेल्या दोन वर्षापासून अडवला असल्यामुळे त्यांची जमीन पडीक पडली आहे. यामुळे त्यांनी तहसील कार्यालय बीड, वन परीक्षेत्र कार्यालय बीड आणि पिंपळनेर पोलीस ठाणे यांना वारंवार निवेदन देवूनही त्यांच्या तक्रारीची दखल घेतली नाही. उलट शेतकर्‍यालाच पोलीसांकडून दमदाटी करण्यात आली. त्यामुळे कंटाळलेल्या शेतकर्‍यांनी पोलीस अधिक्षकांना निवेदन दिले असून मला माझा रस्ता रिकामा करून द्या, नसता मी आत्मदहन करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
खांडेपारगाव येथील दामोधर केशव आमटे यांचे शेत गट नं.१४९, १५० व १५१ मध्ये आहे. या शेतात जाण्यासाठी दामोधर आमटे यांना नंबर बांधावरून रस्ता आहे. मात्र काका किसन ठोकळ, सुदाम काका ठोकळ, शोभा काका ठोकळ हे त्या रस्त्यावरून जाण्यास आमटे यांना मज्जाव करत आहेत. त्यामुळे आमटे यांचे शेत गेल्या दोन वर्षापासून पडक पडून आहे. या संदर्भात आमटे यांनी वेळोवेळी निवेदन दिले आहे. मात्र या निवेदनाची कसलीही दखल पोलीसांनी घेतली नाही. उलट पिंपळनेर पोलीस ठाण्याचे बीट अंमलदार सोनवणे हे शेतकरी आमटे यांना त्रास देत आहेत. त्यांच्या त्रासाला कंटाळून शेतकर्‍याने पोलीस अधिक्षक राजारामा स्वामी यांना निवेदन दिले आहे. त्या निवेदनात म्हटले आहे की, मला माझा रस्ता मिळून द्या अन्यथा मी बीट अंमलदारांसह ठोकळ यांच्या त्रासाला कंटाळून गळफास घेवून आत्महत्या करणार आहे.

Most Popular

error: Content is protected !!