कर्तव्य बजावताना मृत्यू, अंभोरा येथील जवानाचे मेरठमध्ये निधन
आष्टी( रिपोर्टर ):- आष्टी तालुक्याचे सुपुत्र विजय नरूळे यांनी आतापर्यंत विविध ठिकाणी सेवा दिली.दोन – तीन महिन्यानंतर त्यांची सेवा संपणार होती. मात्र दिल्ली मेरठ येथे कर्तव्य बजावत असताना हृदयविकाराच्या झटक्याने त्यांना वीरमरण आले सेवा बजावत असताना त्यांना वीरमरण आल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
आष्टी तालुक्यातील अंभोरा गावचे सुपुत्र असलेल्या 522 ए एस सी बटालियन सुभेदार विजय नरुळे भारतीय सैन्य दलातील जवान शहीद झाल्याने जिल्ह्यावर पुन्हा एकदा शोककळा पसरली आहे. सुभेदार विजय नरुळे यांना कर्तव्य बजावत असताना वीरमरण आले आहे. वयाच्या अवघ्या 45 व्या वर्षी भारतमातेसाठी प्राण पणाला लावले.
लहानपणापासून देशसेवेची आवड होती. त्यामुळे भारतीय सैन्य दलात दाखल झाले नरुळे यांनी आतापर्यंत विविध ठिकाणी सेवा दिली. थोड्याच दिवसानंतर त्यांची सेवा संपणार होती. मात्र त्यांना दिल्ली मेरठ येथे कर्तव्य बजावत असताना दि.12 एप्रिल रोजी सकाळी परेड दरम्यान ह्रदयविकाराच्या झटक्याने वीरमरण आले त्यांच्या पश्चात पत्नी,2 मुले 1 मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या निधनाची दुर्दैवी बातमी आल्याने कुटुंबीय शोकसागरात बुडाले आहे. भारत मातेने एक वीर पुत्र गमावल्याची भावना सर्वत्र व्यक्त केली जात त्यांच्यावर शासकीय इतमामात दि.13 एप्रिल रोजी सकाळी शासकीय इतमामात अंभोरा पोलिस ठाण्याचे सलामी गार्ड उपविभागीय अधिकारी प्रमोद कुदळे, तहसिलदार विनोद गुंडमवार, अंभोरा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित बेंबरे, पोलिस उपनिरीक्षक जेसवाने, पोलिस केदार,तांदळे माने, एकशिंगे, सरपंच, राजकीय, सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.