मोर्चाला अल्प प्रतिसाद
सलीम गवळी । अंबाजोगाई
अंबाजोगाई नगरपरिषदेच्या विरोधात मोठा गाजावाजा करून गजर मोर्चा काढण्यात येणार असल्याची हवा सोशल मीडियाच्या माध्यमातून तयार करण्यात आली होती आज मात्र प्रत्यक्षात काढण्यात आलेल्या मोर्चा मध्ये अंबेजोगाईकराणी पाठ फिरवल्याचे दिसून आले. मागील काही दिवसा पासून अंबाजोगाई नगरपरिषदेच्या सी ओ प्रशासनास विविध प्रकारे अडवणूक करण्याचा प्रयत्न येथील काही राजकीय कार्यकर्त्यांनी चालवीला आहे म्हणून आज नगरपरिषद प्रशासनाच्या विरुद्ध गजर मोर्चा काढण्यात आला होता दोन दिवसांपूर्वीच सी ओ प्रशासनाने पाणी पुरवठा व स्वछते बाबत आपले स्पष्टीकरण अंबाजोगाईकरान समोर केले असल्यामुळे येथील नागरिकांना या बाबत ची स्पष्टता समोर आली असल्यामुळे अंबाजोगाई च्या नागरिकांनी मोर्चा कडे पाठ फिरवल्याचे दिसून आले निवडणुका आल्या कि शहरात मोर्चाना ऊत उयेतोय का असा स्वाला येथील नागरिक उपस्थित करू लागले आहेत.