रिक्षाही पळवून नेला
बीड (रिपोर्टर):- केजला सोडण्यासाठी नकार देणार्या रिक्षा चालकाला धमकावत चाकुचा धाक दाखवून खिशातील बळजबरीने एक हजार रुपये, मोबाईल हिसकावून घेतला व रिक्षाही लंपास केल्याची घटना माजलगाव शहरात 22 जून रोजी घडली. या प्रकरणी आज माजलगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
प्रवीण शेषेराव मिसाळ (रा. अशोकनगर, माजलगाव) या रिक्षा चालकाने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, 22 जून रोजी परभणी चौक येथे ते उभे असताना आरोपी शुभम वाल्मिक ऊर्फ गुल्लु (रा. भीमनगर, माजलगाव) हा आपल्या दोन मित्रांसह तेथे आला. आम्हाला केजला सोड, असे म्हणाला. मात्र रिक्षा चालकाने केजला मी जाणार नाही, असे म्हणताच त्याला चाकुचा धाक दाखवत धमकावले. त्याच्या खिशातील नगदी एक हजार रुपये, मोबाईल हिसकावून घेतला व रिक्षा घेऊन तेथून निघून गेले. या प्रकरणी मिसाळ यांनी आज माजलगाव ग्रामीण पोलिसात तक्रार दिली असून आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास माजलगाव ग्रामीण पोलीस करत आहेत.