रवि शिंदे यांच्या लढ्याला यश
बीड (प्रतिनिधी) मराठा आरक्षणाचा प्रश्न पहिल्यांदा मांडणारे, मराठा आरक्षणासाठी हौतात्म्य स्विकारणारे क्रांतीसुर्य कै. अण्णासाहेब पाटील यांच्या समाजासाठीच्या अलौकिक कार्याची प्रेरणा येणार्या पिढ्यांसाठी मिळत रहावी या उद्देशाने बीड येथील कै अन्नासहेब पाटील यांचे निस्सिम भक्त रवि शिंदे यांनी कै. अण्णासाहेब पाटील यांचा मराठवाड्यातील पहिला पुतळा उभारण्यासाठी सतत दोन वर्ष अखंडित प्रयत्न केले होते. श्री. शिंदे यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले असून.सोमवार दि. 26 जून रोजी बीड पंचायत समितीकडून पुतळा उभारण्यासाठीची जागा हस्तांतरीत केल्याचे पत्र आज पंचायत समिति बी डी ओ यानीं समिति कड़े देण्यात आले आहे.
कै. अण्णासाहेब पाटील यांचे सुपुत्र तथा माजी आ. नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली रवि शिंदे यांनी अण्णासाहेब पाटील विकास फाऊंडेशनच्या माध्यमातून मराठा समाजातील युवकांना रोजगार आणि व्यवसाय संबंधीचे विविध मेळावे घेतलेले आहेत. रवि शिंदे यांनी मराठा समाजातील तरुण आणि समाजहितासाठी प्रेरीत तरुणांचे मोठे संघटन उभे केल्याचे गेल्या दोन वर्षात दिसून आलेले आहे. ज्या मराठा समाजाच्या पुढच्या पिढ्यांचे कल्याण व्हावे या उद्देशाने कै अन्नासाहेब पाटील यांनी संघर्ष केला. त्या संघर्षाची तरुण पिढीला कायम प्रेरणा मिळत राहण्यासाठी अण्णासाहेबांचा पुतळा बीडमध्ये उभारावा ही संकल्पना मनात घेवून रवि शिंदे यांनी जुलै 2021 मध्ये अण्णासाहेब पाटील फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांची प्रथम बैठक घेतली. त्यानंतर 17 जुलै 2021 ला बीड शहरातील सर्व पक्षीय, संघटनांची व्यापक बैठक घेत त्यांच्या समोर पुतळा उभारणीचा प्रस्ताव सादर केला. सर्वांनी एकमताने हा ठराव पारीत करत बीड मध्ये साकारत असलेल्या नुतन पंचायत समिती कार्यालयाच्या आवारातच कै. अण्णासाहेब पाटलांचा पुतळा असावा ही आग्रही मागणी करण्यात आली. पुतळा उभारणीसाठी एक समिती स्थापन करण्यात आली आणि त्या समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी रवि शिंदे यांच्याकडे देण्यात आली होती. 2021 ते 2023 असा दोन वर्षांच्या पाठपुराव्यामुळे तसेच बीडचे आ. संदिप क्षीरसागर यांनी पंचायत समितीचा पुतळा उभारण्या संदर्भात 10 ऑगस्ट 2021
ठराव घेण्यात आला होता. त्या ठरावा नुसार बीड पंचायत समितीच्या आवारात कै. अण्णासाहेब पाटील यांचा पुर्णाकृती पुतळा उभारण्याचे ठरले. रवि शिंदे यांच्या सततच्या पाठपुराव्याला 26 जून 2023 रोजी म्हणजे छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती दिनीच जागा हस्तांतरणाचे पत्र मिळाल्यामुळे मराठा समाजातून आनंद व्यक्त होत आहे.तसेच 24 जून रोज़ी पंचायत समिति मधिल पुतला उभारनार त्या जागेची पाहनी पंचायत समितिचे बी डी ओ अनिरुद्ध सानप,ईजी पवार साहेब, वाघ साहेब तसेच अन्नासहेब पाटिल स्मारक समिति चे अध्यक्ष रवि शिंदे यानी जागेची पहनी केली व जागा निचित्त केली.यावेली मराठा महासंघाचे बीड जिल्हा अध्यक्ष बापूसाहेब सालुंके,के के वडमारे,बालाजी पानझडे,अजय सुरवसे,सनी वाघमारे,वैभव कठाले,नारायण सपकाल,अनिल मोरे,सुदर्शन गोरे,विकास निकम,बाबू आहेर,सुनील मोरे, शैलेश चव्हाण,ईश्वर भांगे,विशाल वाघमारे,कुणाल गलधर ,स्वप्निल गलधर,आकाश मोरे,राहुल हूबरे,ऋषि शेंडगे,दीपक आमटे,गवते,गणेश काले,विलास सातपूते.यवेली आदि युवक उपस्थित होते.
अण्णासाहेब पाटील यांचा 9 फूटी पुर्णाकृती पुतळा असणार- रबि शिंदे
मराठा क्रांतीसुर्य कै. अण्णासाहेब पाटील यांचे मुंबई, सातारा, पुणे आदि ठिकाणी पुतळे उभारण्यात आलेले आहेत. मात्र मराठवाड्यात अद्याप पर्यंत एकही पुतळा उभारण्यात आलेला नव्हता. मात्र बीड पंचायत समितीमध्ये स्थापन होणारा हा पुतळा तब्बल 9 फुटी उंचीचा असणार आहे. बीडकरांच्या दृष्टीने कै अन्नासहेब पाटील यांचा पुतळा उभारण्याचे स्वप्न माझ्या माध्यमातून पुर्ण होत असल्याचा सर्वात मोठा आनंद असल्याची प्रतिक्रिया रवि शिंदे यांनी दिली आहे.