बीड (रिपोर्टर) घरात कोणी नसल्याचा फायदा घेवून घराचे लॉक तोडून अज्ञात चोरट्याने लोखंडी पेटीत ठेवलेले 1 लाख 80 हजार रूपये घेवून पोबारा केल्याची घटना अंबाजोगाई शहरातील जिजाऊ चौक, सिल्वर सिटी येथे घडली. याप्रकरणी अंबाजोगाई शहर पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रदिप बालासाहेब गायकवाड (वय 37, व्यवसाय शेती, रा.आनंदगाव सारणी ता.केज, ह.मु.जिजाऊ चौक, सिल्वर सिटी, अंबाजोगाई) यांनी तक्रार दिली की, दि.16 जून रोजी दुपारी ते घरी नसताना अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत घरातील लोखंडी पेटीचे लॉक तोडून 1 लाख 80 हजार रूपये चोरून घेवून गेले. याप्रकरणी त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात अंबाजोगाई शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.