30 हजाराची लाच स्वीकारली
बीड (रिपोर्टर) पेंडिंग बील काढून देण्यासाठी 30 हजार रुपयांची लाच मागणार्या कार्यकारी अभियंता संजयकुमार कोकणे यांना लाचलूचपत पथकाने रंगेहात पकडले. ही कारवाई सार्वजनिक बांधकाम विभाग अंबाजोगाई येथे दुपारी दोन वाजता करण्यात आली.
पेंडिंग बील काढून देण्यासाठी कार्यकारी अभियंता संजयकुमार कोकणे (सार्वजनिक बांधकाम विभाग अंबाजोगाई) यांनी 30 हजार रुपये मागितल्याची तक्रार एकाने लाचलूचपत प्रतिबंध विभागाकडे केली होती. याची पडताळणी एसीबीने केल्यानंतर दुपारी दोन वाजता बांधकाम विभागात सापळा लावला. या वेळी तीस हजार रुपयांची लाच घेताना कोकणे यांना रंगेहात पकडले. ही कारवाई लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे डीवायएसपी शिनेकर शिंदे यांच्यासह त्यांच्या सहकार्यांनी केली.