गेवराई (रिपोर्टर)ः-कापूस गठाणीची खरेदी विक्री करणार्या व्यापार्याच्या ऑफीसवर आज सकाळी नाशीक येथील इनकम टॅक्सच्या अधिकार्यांनी छापा मारला. दुपारी दिड वाजेपर्यंत हा छापा सुरू होता. आतमध्ये नेमके काय झाले हे अद्याप समजू शकले नसले तरी हा छापा पुणे टू गेवराई या कनेक्शनमधून मारल्याचे सुत्राचे सांगणे आहे. इनकम टॅक्सच्या छाप्यामुळे गेवराईतीलच नव्हे तर जिल्ह्यातील कर बुडव्या व्यापार्यात खळबळ उडाली आहे. सबंधीत व्यापार्या हा खळेगांव येथील असल्याचे सांगण्यात येते. त्याचे गेवराई बायपासवर ऑफीस आहे. त्याठिकाणी हा छापा मारण्यात आला आहे.
याबाबत अधिक असे की, खळेगाव येथील नलावडे नामक कापूस गठाण खरेदी विक्री करणार्या व्यापार्याचे गेवराई बायपास रोडवर मुख्य ऑफीस आहे. या ऑफीसवर आज सकाळी नाशीक येथील इनकम टॅक्सच्या अधिकार्यांनी छापा मारला. संबधीत व्यापारी हा बलाढय असून त्याचे कापूस गठाणमध्ये मोठा व्यापार असल्याचे सांगण्यात येते. सदरचा छापा हा पुणे टू गेवराई या कनेक्शनमधून मारण्यात आल्याचेही सुत्रांकडून सांगण्यात येते. पुणे येथील बायोटॅक्स कंपनीची इनकम टॅक्स मार्फत चौकशी सुरू आहे. त्या कंपनीशी गेवराई येथील नलावडे नामक व्यापार्याचे कनेक्शन आहे. त्यातून हा छापा मारण्यात आल्याचे समजते. आज सकाळ पासून इनकम टॅक्सचे अधिकारी नलावडे यांच्या ऑफीसमध्ये तळ ठोकून असून कागदपत्राच्या पडताळणीसह सबंधीत व्यापार्याची चौकशी सुरू असल्याचे संागण्यात येते. या छाप्याबाबत इनकम टॅक्स अधिकार्याकडून अधिकृत माहिती अद्याप देण्यात आली नसली तरी शहरात इनकम टॅक्स खात्याच्या अधिकार्यांचा छापा पडल्याचे माहिती वार्यासारखी गेवराईत पसरल्याने कर बुडव्या व्यापार्यात खळबळ उडाली आहे. या छाप्यात इनकम टॅक्स अधिकार्यांना काय सापडले हे अद्याप समजू शकले नाही.