Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीडआष्टीत रेल्वे आली रे आली! नगर ते आष्टी हायस्पीड धावली

आष्टीत रेल्वे आली रे आली! नगर ते आष्टी हायस्पीड धावली


आष्टी (रिपोर्टर):- स्व.लोकनेते गोपीनाथ रावजी मुंडे यांनी अहमदनगर-बीड-परळी या रेल्वे मार्गासाठी कायम संघर्ष केला त्यांच्या अगोदर ही अनेक नेत्यांनी रेल्वे आली येणार अशा पोकळ घोषणाकेल्या या घोषणा हवेतच जिरल्या परंतु मुंडे यांनी जिल्ह्याचे खासदार झाल्यानंतर राजकीय वजनाचा उपयोग करून रेल्वे च्या कामाला प्रत्यक्ष मंजूरी मिळवून घेतली त्यांच्या अकाली निधनामुळे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्व मुंडे यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी २८०० कोटी निधी तातडीने देऊन रेल्वेच्या कामाला गती दिली जिल्ह्याच्या माजी पालकमंत्री पंकजाताई मुंडे व खा. प्रितमताई मुंडे या भगिनींनी वडीलांच्या स्वप्नासाठी सर्वतोपरी प्रयत्न करुन लवकरात लवकर रेल्वे कशी धावेल यासाठी दिवस रात्र प्रयत्न केले.अहमदनगर ते आष्टी ६० किमी अंतरावर आज प्रत्यक्ष हायस्पीड ने रेल्वे धावल्याने त्यांचे स्वप्न प्रत्यक्ष साकार झाले,आज सायंकाळी खासदार प्रितमताई मुंडे हिरवा कंदील दाखवून हायस्पीडने रेल्वे नगरकडे रवाना होणार आहे.


बीड जिल्ह्याच्या दृष्टीने रेल्वे चा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय होता.कारण जिल्ह्यात परळी सोडता इतर कुठेच रेल्वेचा १ इंच ही रोळ उपलब्ध नव्हता नगर बीड परळी रेल्वे पाहण्यासाठी जिल्ह्यावासियांना २७ वर्षे चातकाप्रमाणे प्रतीक्षा करावी लागली होती.अहमदनगर ते आष्टी या ६० किलोमीटर अंतराचे काम पूर्ण झाले असून बुधवारी सकाळी नगरहून सोलापूर वाडी येथे पूजन होऊन आष्टीपर्यंत रेल्वे धावली आहे.रेल्वे प्रकल्पामुळे बीड जिल्ह्यांतील कृषी, औद्योगिक आणि पर्यटन उद्योगांना चालना मिळणार असून, विकासाला गती मिळणार आहे.अहमदनगर-बीड-परळी रेल्वे मार्ग २६१ किलोमीटरचा असून गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रश्न रखडला होता. रेल्वेमुळे औद्योगिक वसाहती निर्माण होण्यास मोठ्या अडचणी होत्या. शिवाय बीड जिल्ह्यात उत्पादित झालेला शेतमाल किंवा इतर कच्चामाल परराज्यात किंवा परजिल्ह्यात नेण्यासाठी रेल्वे नसल्याने मोठ्या अडचणी निर्माण होत होत्या १९९५ साली या नगर बीड परळी रेल्वे मार्गला तत्वतः मंजुरी मिळाली होती. त्यावेळी केवळ ३५३ कोटी खर्च अपेक्षित होता. मात्र, बीड-नगर रेल्वे मार्गाला रेल्वे मंत्रालयाने निधी देण्यास टोलवाटोलवीच केली गेली.अनेक वर्ष हा प्रकल्प रखडल्याने या रेल्वे मार्गासाठी आता २८०० कोटीची आवश्यकता आहे. पण केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आल्यावर स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या आग्रहास्तव या २७ वर्षाहून अधिक काळापासून रखडलेल्या कामाकडे लक्ष दिले. त्यामुळे हे काम प्रगतीपथाने पूर्ण झाले असून आज सकाळी ८ वाजता नगर येथून सोलापूर वाडी कडा आष्टी इथपर्यंत रेल्वे प्रत्यक्ष धावली असल्याने स्व.गोपीनाथरावजी मुंडे यांचे स्वप्न साकार झाले असून रेल्वे पाहण्यासाठी नागरीकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.सायंकाळी ४ वाजता खा. प्रितमताई मुंडे हिरवा कंदील दाखवल्यानंतर हायस्पिडने रेल्वे नगरकडे रवाना होणार आहे.

रेल्वेच्या संघर्षात योगदान देणार्‍यांचे अभिनंदन,महाराष्ट्र शासनाचे आभार-ना.मुंडे

dm munde


अनेक वर्षापासून बीड जिल्ह्यावासियांचे स्वप्न साकारत आहे. आज नगर ते आष्टी या महामार्गावर हायस्पीड रेल्वेची चाचणी होत आहे. बीड रेल्वेच्या उभारणीत केंद्राच्या बरोबरीने ५० टक्के वाटा देणार्‍या राज्य शासनाचे तसेच या संघर्षात योगदान दिलेल्या प्रत्येक बीड जिल्हा वासियांचे आभार आणि अभिनंदन असे ट्विट करत राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी रेल्वेसाठी संघर्ष करणार्‍यांचे अभिनंदन करत राज्य शासनाचे आभार व्यक्त केले.

पंकजाताई मुंडे यांचं ट्विट

pankja munde 3

एक साकार स्वप्न धावणार बीडमध्ये.. माझ्या जिल्ह्यातील प्रत्येक घटकांचे अभिनंदन.. ज्यांनी अनेक दशके लढाई दिली असं ट्विट भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी केलं आहे. बीड रेल्वेमार्गाच्या स्वप्नपूर्तीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांचे आभारही त्यांनी मानले आहेत. बीडच्या जनतेचा जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या नगर-बीड-परळी रेल्वेमार्गाची आष्टीपर्यंतची हायस्पीड चाचणी आज सायंकाळी होत असून हा मार्ग आता पुर्णत्वाकडे चालला असून लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी पाहिलेलं स्वप्न पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर पंकजाताई मुंडे यांनी हे ट्विट केलं आहे. पंकजाताई यांनी म्हटलं आहे की,एक साकार स्वप्न धावणार बीडमध्ये.. माझ्या जिल्ह्यातील प्रत्येक घटकांचे अभिनंदन ज्यांनी अनेक दशके लढाई दिली. खासदार डॉ.प्रितमताई मुंडे अजून एक रेकॉर्ड तुमच्या नावावर… पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आमच्या शब्दाला पूर्ण करण्यात योगदान दिलं. आभारी आहोत..मोदीजी, देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांचे..असं ट्विट त्यांनी केलं आहे.

Most Popular

error: Content is protected !!