Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeराजकारणश्रेयवादाच्या मशालीत प्रतिष्ठेची आग नगर पंचायतीत बंधु का भगिनीला साथ?

श्रेयवादाच्या मशालीत प्रतिष्ठेची आग नगर पंचायतीत बंधु का भगिनीला साथ?


बीड (रिपोर्टर):- अर्ध्या मार्गावर हायस्पीड रेल्वे धावल्यानंतर श्रेयबाजी घेण्यासाठी बीड जिल्ह्यातील नेत्यांची झुंबड उडालेली असतांनाच दुसरीकडे पाच नगर पंचायतीच्या निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष लागून असल्याचे पुन्हा एकदा कालच्या श्रेयबाजीवरून सोशल मिडियावर व्यक्त झालेल्या प्रतिक्रियेतून दिसून येते. जिल्ह्याच्या माजी पालकमंत्री आणि विद्यमान पालकमंत्री मुंडे बंधु-भगिणींनी या निवडणुकीसाठी आपली प्रतिष्ठापणाला लावली होती. दोघांनीही आष्टी, पाटोदा, शिरूर, केज, वडवणी नगर पंचायतीसाठी व्यासपीठावरून भाषणे केली होती. त्यानुषंगाने या पाच नगर पंचायतीत कोण निवडूण येतं? आणि तिथं मुंडे बंधु की भगिणीचे वर्चस्व राहतं याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

बीड जिल्हा राजकीयदृष्ट्या संवेदनशील मानला जातो. माजी पालकमंत्री पंकजा मुंडे आणि विद्यमान पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या होमपीच असलेल्या परळी नगर पालिकेची निवडणूक नसली तरी बीड जिल्ह्यातील आष्टी, पाटोदा, शिरूर, केज, वडवणी या पाच नगर पंचायतीच्या निवडणुकांसाठी गेल्या आठवड्यात मतदान झाले. या पाचही नगर पंचायती आपल्या ताब्यात याव्यात यासाठी बंधु भगिनींनकडून आरोपप्रत्यारोप झाले. (पान ७ वर)
पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंच्या खात्याची खिल्ली केली तर प्रतिउत्तरा खातर धनंजय मुंडेंनी ते खातं किती महत्त्वाचं, संविधानीक आणि आठरापगड जातींचा सर्वांगीण विकास करणारं असल्याचं पुराव्यानिशी सांगितलं. एवढेच नव्हे तर स्व.गोपीनाथ मुंडे या नावाने सुरू केलेल्या महामंडळाचा दाखलाही दिला. त्यामुळे या दोघांनी या पाचही नगर पंचायतीची निवडणुकी अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. ओबीसी आरक्षण रद्द केल्यामुळे आरक्षित जागांवर उशीरा निवडणुक होत आहे. १८ जानेवारीला आरक्षित जागांवर या पाचही नगर पंचायतीसाठी निवडणुक होत असून नगर पंचायतीचा निव्वळ निकाल १९ जानेवारीला घोषीत होणार आहे. त्यामुळे या निकालाकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे. काल बहुचर्चित नगर-बीड-परळी रेल्वे आष्टीपर्यंत धावली आणि पुन्हा श्रेयवादाची मशाल बीडमध्ये पेटली. त्यातून समर्थकांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून नगर पंचायतीच्या निकालाकडे लक्ष केंद्रीत केले आणि पुन्हा वर्चस्वासह नगर पंचायतीची निवडणूक मुंडे बंधु-भगिनींसाठी प्रतिष्ठेची ठरली. त्यामुळे १९ जानेवारीला या पाच नगर पंचायतीत कोणाचं वर्चस्व राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Most Popular

error: Content is protected !!