Thursday, January 20, 2022
No menu items!
Homeबीडबीड जिल्ह्यात वर्षभरात २१० शेतकर्‍यांच्या आत्महत्या

बीड जिल्ह्यात वर्षभरात २१० शेतकर्‍यांच्या आत्महत्या


मराठवाड्यात ८८७ शेतकर्‍यांनी मृत्यूला कवटाळले
बीड (रिपोर्टर) महाराष्ट्रामध्ये शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरुच आहे. कर्जबाजारी, नापिकी व अवकाळी पावसामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडत आहेत. गेल्या वर्षभरामध्ये बीड जिल्ह्यात २१० शेतकर्‍यांनी आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपविली.


गेल्या दहा वर्षांपासून महाराष्ट्रातल्या मराठवाड्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र वाढले आहे. शेती पिकाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडत आहेत. त्यातच अवकाळी पाऊस आणि दुष्काळ पडत असल्याने शेतकर्‍याचं आर्थिक गणित कोलमडलं. यावर्षी खरीप पिकं चांगली आली होती, मात्र अतिरिक्त पावसामुळे खरीप पिकाचं मोठं नुकसान झालं. शेतकर्‍यांनी शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात खर्च केला होता. हाता-तोंडाला आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकरी अडचणीत सापडले. राज्य सरकारने नुकसान भरपाई घोषीत केली असली तरी नुकसानभरपाई अत्यंत तुटपुंजी आहे. राज्य शासनाने घोषीत केलेले अनुदान अद्यापही सर्व शेतकर्‍यांना मिळालेले नाही. कर्जमाफी आणि अनुदानाची घोषणा करणे म्हणजे शेतकर्‍यांचं संवर्धन करणे असं होत नाही. शेतकर्‍यांनी आत्महत्या करू नये अशी परिस्थिती निर्माण करण्यात केंद्र आणि राज्य सरकारांना यश आलेले नाही. आत्महत्येचे सत्र कमी होण्याऐवजी वाढतच आहे. वर्षभरात बीड जिल्ह्यात २१० शेतकर्‍यांनी आत्महत्या करून आपलं जीवन संपवलं आहे. मराठवाड्यात सर्वात जास्त आत्महत्या या बीड जिल्ह्यामध्ये झाल्या आहेत.

Most Popular

error: Content is protected !!