Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeदेश विदेशराज्यातल्या लॉकडाऊननंतर देशपतळीवर होणार निर्णय, मोदींनी बोलावली उच्चस्तरीय बैठक

राज्यातल्या लॉकडाऊननंतर देशपतळीवर होणार निर्णय, मोदींनी बोलावली उच्चस्तरीय बैठक


नवी दिल्ली (वृत्तसेवा)- देशात करोनाने पुन्हा एकदा थैमान घालण्यास सुरुवात केल्याची स्थिती निर्माण झाली आहे. देशात काही दिवसांपूर्वी आलेल्या करोनाच्या दुसर्‍या लाटेनंतर आता पुन्हा करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने महाराष्ट्रासह अनेक राज्यांनी निर्बंध कठोर केले आहेत. केंद्रीय आरोग्य विभागाने शनिवारी दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासांत करोनाचे नवे १ लाख ४१ हजार ९८६ रुग्ण नोंदले गेले. त्यानंतर आता रविवारीदेखील देशातील करोनाबाधितांचा आकडा दीड लाखांच्या पुढे गेला आहे.


एका दिवसात सापडलेल्या करोनाबाधितांची ही सर्वात मोठी संख्या आहे. रविवारी १,५९,६३२ नवीन करोना रुग्ण आढळले. त्याच वेळी ४०,८६३ रुग्णही बरे झाले आहेत. दरम्यान, गेल्या २४ तासांत करोनामुळे ३२७ मृत्यू झाले आहेत. दैनिक पॉझिटिव्हीटी रेट १०.२१ टक्क्‌यांपर्यंत वाढला आहे. सध्या देशात सक्रिय रुग्णांची संख्या ३,४४,५३,६०३ आहे. तर ४,८३,७९० लोकांना या संसर्गजन्य आजाराने आपला जीव गमवावा लागला आहे. आतापर्यंत एकूण १५१.५८ कोटी इतके लसीकरण करण्यात आले आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!