Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीडकेजकेज शहरातील चारही वार्डात निवडणूक अटीतटीची, काँग्रेस,राष्ट्रवादी, आघाडी, शिवसेनेचे नेते दारोदारी

केज शहरातील चारही वार्डात निवडणूक अटीतटीची, काँग्रेस,राष्ट्रवादी, आघाडी, शिवसेनेचे नेते दारोदारी

केज (रिपोर्टर) केज शहरातील चार वार्डासाठी 18 जानेवारीला मतदान होणार असल्याने प्रचाराचा अंतीम टप्पा सुरू आहे. चारही वार्डात अटीतटीची लढत होत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, जनविकास आघाडी आणि शिवसेनेचे नेते मतासाठी दारोदारी फिरत असल्याचे दिसून येत आहे.
ओबीसी आरक्षणामुळे शहरातील चार जागेसाठी निवडणूक मागे ठेवण्यात आली होती. मात्र न्यायालयाच्या निर्णयानुसार निवडणूका घेतल्या जात आहेत. 18 तारखेला मतदान होवून 19 तारखेला मतमोजणी होणार आहे. चारही वार्डात अटीतटीची लढत होत आहे. काँग्रेस राष्ट्रवादी जनविकास आघाडी आणि शिवसेनेचे उमेदवार याठिकाणी निवडणूक लढवत आहेत. वार्ड क्र.2 मधून बजरंग सोनवणे यांची मुलगी हर्षदा सोनवणे या निवडणूकीच्या रिंगणात उतरल्याने सदरील या वार्डात तगडी फाईट होत असताना दिसून येत आहे. तर जनविकास आघाडीचे प्रमुख हारूण इनामदार यांच्या पत्नी इनामदार आलिया बेगम हारूण या वार्ड क्र.8 मधून निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे या वार्डातही निवडणूक चांगलीच अटीतटीची होत असल्याचे दिसून येत आहे. बजरंग सोनवणेे, काँग्रेसचे आदित्य पाटील, जनविकास आघाडीचे हारूण इनामदार, रमेश आडसकर, शिवसेनेचे गिरीष देशपांडे यांच्यासह आदि (पान 7 वर)
पदाधिकारी आपल्या उमेदवारासाठी दारोदारी मतदान मागताना दिसून येत आहे. वार्ड क्र.1 मध्ये अजिमोद्दीन शेख-राष्ट्रवादी, सय्यद अखील-जनविकास आघाडी, जाधव लक्ष्मण विठोबा-काँग्रेस, वार्ड क्र.2 कराड आशाबाई सुग्रीव-आघाडी, सोनवणे हर्षदा बजरंग – राष्ट्रवादी, कराड कविता उध्दवराव-काँग्रेस, दांगट सतगना गुलाबराव-शिवसेना, वार्ड क्र.8 मधून इनामदार आलिया अंजुम गौसोद्दीन-राष्ट्रवादी, इनामदार आलिया बेगम हारूण-आघाडी, सय्यद मसुदा बेगम-काँग्रेस, वार्ड क्र.12 खराडे संजीवनी सुधीर-राष्ट्रवादी, वाकडे मारोती शिवाजीराव-आघाडी, गुंड सोमनाथ बाळासाहेब-काँग्रेस, शेख शकील -अपक्ष हे उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उतरलेले आहेत.

Most Popular

error: Content is protected !!