बीड (रिपोर्टर) जिल्ह्यात कोरोनाबाधीतांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने बीड जिल्ह्यात प्राथमिक आणि माध्यमिक शाळा सोमवारपासून उघडणार नाहीत. असे जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी शिक्षण विभागाला सांगितल्याचे वृत्त असून सोमवार ऐवजी शुक्रवार पर्यंत जिल्ह्यातील कोरोनाबाधीतांच्या संख्येवर लक्ष ठेवून शुक्रवारनंतर शाळा उघडण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. मात्र सोमवारपासून दहावी आणि बारावीच्या वर्गाला मात्र परवानगी देण्यात येणार आहे.
राज्य शासनाने राज्यातील शाळा उघडण्याबाबत निर्णय घेतला. त्या निर्णयानुसार सोमवारपासून राज्यभरातील शाळा पुन्हा सुरू होणार आहेत. राज्य सरकारने निर्णय देताना शाळा उघडण्याबाबत त्या त्या जिल्ह्यातील जिल्हाधिकार्यांना अधिकार दिले. बीड जिल्ह्यात गेल्या आठ दिवसापासून दिवसेंदिवस कोरोनाची संख्या वाढत जात आहे. आज शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्याबाबत जिल्हाधिकार्यांकडे प्रस्ताव पाठवल्यानंतर जिल्हाधिकार्यांनी आरोग्य विभागाशी याबाबत चर्चा केली. त्यावेळी जिल्ह्यातला कोरोनाबाधीतांचा आलेख वाढता असल्याचे पाहून बीड जिल्ह्यात सोमवारपासून शाळा उघडण्यात येणार नाहीत. असे जिल्हाधिकार्यांनी शिक्षण विभागाला सांगितले. शुक्रवार नंतर शाळा सुरू करण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी सोमवारपासून दहावी बारावीचे वर्ग सुरू करण्यास जिल्हाधिकार्यांनी परवानगी दिली आहे.
बीड जिल्ह्यातील शाळांना सोमवारनंतरही कुलूप
ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.