संगीत रंगभूमीवर शोककळा
मुंबई (रिपोर्टर) संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायिका आणि अभिनेत्री कीर्ती शिलेदार यांचं आज पहाटे निधन झालं आहे. वयाच्या ७० व्या वर्षी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागील काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खराब होती. आज उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. २०१८ मध्ये त्यांनी ९८व्या अखिल भारतीय मराठी नाटय् संमेलनाचं अध्यक्षपद भूषवलं होतं, त्यांची एकमताने निवड झाली होती. मराठी रंगभूमी सक्रीय ठेवण्यात त्यांचा मोठा वाटा होता. जयराम आणि जयमाला शिलेदार या दाम्पत्याच्या पोटी जन्मलेल्या कीर्ती शिलेदार यांनी मराठी रंगभूमीसाठी फार मोठं योगदान दिलं.