बीड (रिपोर्टर): खा. शरद पवार गटाचे आ. रोहीत पवार यांना ईडीकडून नाहक त्रास देऊन त्यांच्यावर दबाव आणण्याचे काम केले जात असल्याने याच्या निषेधार्थ आज परळीमध्ये उपविभागीय कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली तर बीडमध्ये जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
ईडीने आ. रोहीत पवार यांना नोटीस बजावली असून चौकशीसाठीही बोलवण्यात आले होते. जाणीवपुर्वक पवार यांना त्रास देण्याचेकाम भाजप सरकार करत असल्याने याच्या निषेधार्थ आज परळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने उपविभागीय कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आले. हे आंदोलन सुदामतीताई गुट्टे, बबन गिते यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले असून या वेळी अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती तर बीडमध्येही आ. संदीप क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले. या वेळी प्रा. सुशिला मोराळे, माजी आ. संय्यद सलीम, जावेद कुरेशी, के.के. वडमारे सह आदींची उपस्थिती होती.












