Tuesday, December 7, 2021
No menu items!
Homeबीडजिनींगवर शेतकर्‍यांची पिळवणूक व्यापार्‍यांना मात्र सुगीचे दिवस

जिनींगवर शेतकर्‍यांची पिळवणूक व्यापार्‍यांना मात्र सुगीचे दिवस


बीड (रिपोर्टर)ः- शासकीय आणि खाजगी जिनींगवर शेतकर्‍यांची ग्रिडरकडून पिळवणूक होवू लागली. चांगला कापूस असला तरी त्यात ग्रिडर खोट दाखवितात.व कापसाला कमी भाव लावतात. नाही तर शेतकर्‍यांना कापूस परत घेवून जाण्यास भाग पाडले जाते. दुसरीकडे मात्र व्यापार्‍यांच्या कापसाबाबत कसलीही तक्रार नसते. काही व्यापारी कापसावर पाणी मारुन कापूस विकतात. त्याबाबतही ग्रिडर एक शब्दही बोलत नाही. शेतकर्‍याप्रती दुजाीभाव दाखवला जात असल्याने अशा ग्रिडर विरोधात कारवाई करण्याची मागणी शेतकर्‍यांकडून केली जावू लागली.
बीड जिल्ह्यामध्ये कापासाचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न निघते.यावर्षी उशीरा जिनींग सुरू करण्यात आल्या. त्यामुळे शेतकर्‍यांची मोठ्या प्रमाणात खाजगी व्यापार्‍यांनी लूट केली. सध्या जिनींग सुरू असल्यातरी त्याठिकाणी ग्रिडरचा मनमानी कारभार चालू लागला. चांगला कापूस असला तरी त्यात जाणीवपूर्वक खोट दाखवली जावू लागली. खोट असल्याचे कारण पुढे करत कापसाला कमी भाव लावला जातो. नाही तर कापूस परत पाठवला जात आहे. दुसरीकडे व्यापार्‍यांबाबतीत कुठेही नियम अवलंबले जात नाही. व्यापार्‍याचा कसलाही कापूस असला तरी त्या बाबतीत ग्रिडरची तक्रार नसते.डोळे झाकून व्यापार्‍याचा कापसाचा काटा केला जात आहे. शेतकर्‍याप्रतिच गे्रडरचा का दुजाभाव असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!