बीड (रिपोर्टर)ः- सिंदफणा नदीच्या पात्रातून अनाधिकृतपणे वाळूचा उपसा सुरूच आहे. गेल्या काही महिन्यापासून वाळू उपसली जात आहे. कसल्याही प्रकारचा टेंडर नसतांना वाळू उपसली जात आहे. याकडे संबधीत विभागातील महसूल विभागा दुर्लक्ष करत आहे. वाळू माफीया या वाळूतून मोठी कमाई करत आहे. काही ठिकाणी वाळूचा साठा करुन ति चढ्या भावात विक्री केली जात आहे. कुक्कडगांव, खुड्रस,चव्हाणवाडी भागातील नदीचे पात्र वाळूचे पात्र खिळखिळे केले.
बीड जिल्ह्यातील अनेक नदीपात्रातून अनाधिकृतपणे वाळू उपसा सुरू आहे. महसूल प्रशासन टेंडर काढत नसल्याने माफीया मंडळी वाळू उपसत आहे. बीड तालुक्यातील कुक्कडगांव, खुड्रंस,चव्हाणवाडी या हद्दीतील सिंदफणा नदी पात्रातून गेल्या काही महिन्यापासून वाळूचा अनाधिकृत वाळूचा उपसा सुरू आहे. ट्रॅक्टरद्वारे वाळू इतर ठिकाणी नेवून साठवण केली जाते नंतर ति चढ्या भावाने विक्री केली जाते. या वाळू उपसाकडे महसूल विभागा जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. वाळूतून माफीया मोठी कमाई करत असल्याचे दिसून येत आहे.