बीड :- माजलगावच्या जाळपोळीत आमची नावे विनाकारण का गोवली? असा जाब विचारत आ. सोळंके यांचे स्वीय सहायक महादू सोळंके यांना रंगोली कॉर्नरवर शुक्रवारी दुपारी मारहाण करण्यात आली. भाजपचे तालुकाध्यक्ष असलेले अरूण राऊत यांचे पुतणे अजयसिंह राऊत यांनी ‘माझे नाव या जाळपोळीत विनाकारण का गोवले ? माझ्यावर गुन्हा दाखल करतो का? मी जाळपोळीत होतो तरी का ?’ असे म्हणत सलूनमध्ये शेवींग करत असलेल्या महादू सोळंकेंना बाहेर ओढत आणून मारहाण केली. माजलगावात अनेकांनी हा प्रकार पाहीला. माजलगावची ही घटना हेच सांगून जाते की आ. सोळंके यांच्याबद्दल मराठा समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर राग ठासून भरलेला आहे.