बीड शहरामध्ये पहाटेच्या दरम्यान घडली घटना
बीड, (रिपोर्टर)ः-शॉट सर्कीटमुळे फर्निचरच्या दुकानाला आग लागली असुन या आगीमध्ये दुकानातील विविध फर्निचर जळुन खाक झाले. ही घटना पहाटे 2 च्या सुमारास (सावतामाळी चौक) येथे घडली. आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले होते. मात्र आग लवकर अटोक्यात आली नाही. या आगीत 15 ते 20 लाखांचे नुकसान झाले असल्याचे सांगण्यात येते. या जळीत घटनेने शहरातील व्यापार्या हळहळ व्यक्त केली जात आहे.
सावता माळी चौक या भागात सीएनसी आर्ट या नावाचे फर्निचरचे दुकान आहे. पहाटे 2 च्या सुमारास या दुकानाला आग लागली. आगीने मोठे रौद्र रूप धारण केले होते. आग लागल्याचे काही लोकांच्या निर्देशनात आल्यानंतर त्या ठिकाणी मोठी गर्दी जमा झाली होती. आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले होते. मात्र आग लवकर अटोक्यात आली नाही. दुकानात विविध प्रकारचे फर्निचर होते. या सर्व फर्निचरचा अक्षरशः कोळसा झाला. दुकानदाराचे या घटनेत 15 ते 20 लाखांचे नुकसान झाले. ही आग शॉट सर्कीटमुळे लागली असल्याचे सांगण्याता येते.











