आष्टी( रिपोर्टर ):-
येथील टायगर अकॅडमीमध्ये रात्रीच्या जेवणामुळे ४० तरूणांना विषबाधा झाली आहे.या अकॅडमीत आष्टी तालुक्यासह इतर शासकीय सेवेत जाण्यासाठी नवनिर्वाचित उमेदवार प्रशिक्षणासाठी ऍडमिशन घेत असतात.यामध्ये शुक्रवार रात्री जेवल्यानंतर मध्यरात्री दोन च्या सुमारास विद्यार्थ्यांना जुलाब व उलटी होऊ लागली हळू हळू
सगळ्याच विद्यार्थ्यांना त्रास होऊ लागल्याने उपचारासाठी आष्टीच्या ग्रामीण रूग्णालयात दाखल केले.यातील जवळपास २० विद्यार्थ्यांना आहिल्यानगर येथे उपचारासाठी पाठविले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी आष्टी शहरातील टायगर अकॅडमीमध्ये भरतीपुर्व प्रशिक्षणासाठी जवळपास ४० विद्यार्थी आहेत. त्यांनी नेहमी प्रमाणे विद्यार्थ्यांना शुक्रवार (दि.२८) रोजी रात्री ९ च्या सुमारास जेवण दिले.यामध्ये हुलग्याची भाजी,भाकरी,भात दिला.परंतु मध्यरात्री दिड च्या सुमारास काहि विद्यार्थ्यांना जुलाब व उलटीचा त्रास होऊ लागला हळूहळू सर्वच विद्यार्थ्यांना त्रास होऊ लागल्याने त्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.यातील काहि विद्यार्थ्यांची गंभीर असल्याने त्यांना उपचारासाठी आहिल्यानगर येथे पाठविण्यात आले.
या विषबाधेमळे अभिजीत अंगद शेळके,विकास आप्पासाहेब धुमाळ,सायली बाळू मांडगे,शिवाजी भाऊसाहेब धनवडे,आकाश आप्पा बांगर,सनी मोहन डफाळ,सुभाष खंडू धोत्रे,गोकुळ नाथा धुमाळ,सुभाष सोमीनाथ धोत्रे,कृष्णा सुरेश पांडुळे, रोहन संजय शेळके,प्रणव सर्जेराव भोसले,ऋषिकेश रामदेव खाडे,गणेश संजय नरवडे, आकाश रावसाहेब डफळ,विकास साहेबा फुलमाळी,रोहित बजरंग जगताप,गौरी काकासाहेब पाटील,विद्या विजय बोराडे, नेहा अशोक बारखेड, रोहित धर्मराज धनवडे,करुणा संतोष खंडागळे, रोहित रामभाऊ रोडे,अशोक उत्तम शेळके,विमल सुदाम देशमुख,मनीषा सायकड,प्रज्वल काकडे, सुनिता महात्माजी वाहटुळे,अनिरुद्ध बापूराव मिसाळ,मंगल संभाजी भोंगाळे,करण महादेव शेळके,राम प्रकाश शिंदे,दीक्षा गोरख गजघाट, हर्षद बबन कदम,देवकाते मयूर भीमसेन,कुदनाने किरण भाऊसाहेब,राहुल कैलास साबळे,आसिफ इनुस शेख, सुरज महादेव डोके,अशोक गवाजी रूपकर, आयान पठाण यांना झाली आहे.
विद्यार्थ्यांनां वेळेत उपचार मिळाल्याने काळजी करण्याचे कोणतेच कारण नाही-तहसिलदार
सर्व प्रशिक्षणार्थींची प्रकृती स्थिर आहे.नेमकी विषबाधा का झाली याची चौकशी करू,ज्या विद्यार्थ्यांनची प्रकृती गंभीर आहे ते त्यांना पुढील उपचारासाठी आहिल्यानगर येथे पाठविले आहे.सर्व विद्यार्थ्यांनां वेळेत उपचार मिळाल्याने काळजी करण्याचे कोणतेच कारण नाही.
-वैशाली पाटील,तहसिलदार आष्टी
मला काहि माहिती नाही सीएस ला विचारा-डॉ.पवार
याबाबत आष्टी ग्रामीण रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधिक्षक पवार यांना एवढी मोठी विषबाधेची घटना घडल्याने पत्रकारांनी माहिती विचारण्यासाठी फोन केला असता मी आठ दिवसांपुर्वीच वैद्यकीय अधिक्षक पदाचा राजीनामा जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे पाठविला आहे.तुम्ही सीएस ला विचारा











