
बीड, (रिपोर्टर)ः- शहरातील माने कॉम्प्लेक्स परिसरामध्ये काही दिवसापुर्वी यश देवेंद्रसिंह ढाका या तरूणाचा खून करण्यात आला होता. या प्रकरणात आरोपी विरोधात गुन्हे दाखल झाले होते. यातील निखील घोडके नावाचा आरोपी फरार होता. या फरार आरोपीला रात्री 12 वाजता पोलिसांनी जेरबंद केले आहे.
25 सप्टेंबर रोजी रात्री 8.30 च्या सुमारास यश देवेंद्रसिंह ढाका या तरूणाचा माने कॉम्प्लेक्सपरिसरामध्ये खून करण्यात आला होता. या प्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील निखिल घोडके हा फरार होता. त्याचा पोलीस शोध घेत होते. रात्री 12 वाजण्याच्या दरम्यान घोडका राजुरी येथून डीवायएसपी पुजा पवार व त्यांच्या टिमने त्यास ताब्यात घेतले आहे.








