
महिला बचत गटांना 65 टक्के अनुदानावर ड्रोन मिळणार
बीड (रिपोर्टर): केेंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त विद्युमाने महिला बचत गट, शेतकर्यांसाठी विविध योजना राबविण्यात येत असतात. महिलांना सक्षम करण्यासाठी कर्ज देखील उपलब्ध करून दिले जाते. आता केंद्र सरकारने नमो ड्रोनदीदी योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत ड्रोन खरेदीसाठी बचत गटांना पासष्ट टक्के अनुदान दिले जाणार आहे. या योजनेमुळे बचतगटांना चांगला लाभ होऊ शकतो.
केंद्र सरकारच्या नमो ड्रोनदीदी योजनेच्या व राज्य कृषी विभागाच्या यांत्रिकीकरण उपअभियानांतगर्र्त महिला बचत गटांना ड्रोन देण्यात येणार आहेत. हे ड्रोन 65 टक्के अनुदानावर दिले जाणार, म्हणजेच पाच लाख रुपयांचे अनुदान गटांना मिळणार आहे. महिला बचत गटांसह शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी यांना देखील या उत्पादनाचा लाभ मिळणार आहे. महिलांचे सक्षमीकरण आणि शेतकरी गटांचे आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमाने ही योजना सुरु करण्यात आली आहे.








