अघोषीत संपत्तीवर दंडाऐवजी कर भरण्याची तरतूद
देशात तीन आयुर्वेद संस्था, पाच युनिव्हर्सिटी
अर्थसंकल्पात रेल्वेबाबत मोठी घोषणा, सात हायस्पीड कॉरिडोअर बांधणार, पुणे, मुंबईसह अन्य शहरांना फायदा
प्रत्येक जिल्ह्यात मुलींसाठी हॉस्टेल
भारतीय विस्तार एआयची घोषणा
शेतकर्यांसाठी डिजिटल क्रांती
बीड (रिपोर्टर): स्वतंत्र भारताच्या इतिहासात प्रथमच रविवारी संसदेमध्ये केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 सादर करण्यात आला. देशाच्या अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी या वर्षीचा अर्थसंकल्प विकसित भारत 2047 या दिर्घकालीन आर्थिक दृष्टीकोनावर आधारीत असल्याचे सांगून कर सुधारणा, पायाभूत सुविधा, एमएसई व कृषी क्षेत्रावर भर देत नव्या आयकर कायद्याची प्रस्तावना त्याचबरोबर 12.2 लाख कोटींच्या अभूतपूर्व भांडवली खर्चाची घोषणा या अर्थसंकल्पात केली. सेमी कंडक्टर, बायोफार्मा, दुर्मिळ पृथ्वी खनिजे यासाठी नवीन उपक्रम यासह देशातील विविध आर्थिक क्षेत्रांना चालना देणार्या धोरणांचा समावेश असून अर्थसंकल्पाची घोषणा करण्यात आल्यानंतर वैद्यकीय उपकरणे इथीएम आयएम बॅटरी, सौर पॅनल, वैद्यकीय उपकरणे, एलसीडी, एलईडी, भारतात बनवलेले कपडे, कॅन्सरचे औषध, मधुमेहाचे औषध, क्रीडा साहित्य, मोबाईल फोन, ईव्ही बॅटी, ईव्ही वाहने, मोटारसायकल, फ्रोझन मासे, इव्हीलिथीयम बॅटरी, परदेशी शिक्षण घेणे, सीएनजी, बायोगॅस, क्रीडा वस्तू, बोट, मोटारसायकल, वैद्यकीय उपकरणे, अपघात विमा, मोटारसायकल हे स्वस्त होणार आहेत. तर टीव्हीसी फ्लेक्स शिटस्, इंटर अॅक्टीव्ह फ्लॅग पॅनल डिस्पले, इंटर अॅक्टीव्ह डिस्प्ले, तंबाखू, फिल्टर खैनी, सुगंधी तंबाखू, गुटखा, दारू, भंगार, ऑप्शन ट्रेडिंग, खनिज हे महाग होणार आहेत. निर्मला सितारामण यांनी अर्थसंकल्प मांडल्यानंतर इन्कम टॅक्स स्लबॅ जैसे थेचे धोरण आखले अन् इकडे शेअरबाजारात प्रचंड कोलाहल माजले. निफ्टी 400 पेक्षा जास्त अंकाने, सेन्सेक्स 1200 अंकाने तर बँक निफ्टी 1000 अंकाने कोसळले.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी आज 1 फेब्रुवारी रोजी देशाचा अर्थसंकल्प मांडला. सलग नवव्यांदा हा अर्थसंकल्प सितारामण यांनी सादर केला. इतिहासात पहिल्यांदाच हा अर्थसंकल्प रविवारी मांडण्यात आला असून सितारामण यांनी आम्ही देशातील गरिबी निर्मूलनासाठी महत्वाचे काम केले असल्याचे सांगत देश गेल्या 12 वर्षांपासून प्रगतीपथावर असल्याचे सांगितले. देशामध्ये गुंतवणूक वाढली आहे, भारत विकासाकडे वाटचाल करत आहे. जीएसटी सोपं बनवलं. रोजगाराच्या संधी वाढवल्या, हे आमचे उद्दिष्ट असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगून काही महत्वाच्या घोषणा केल्या. महाराष्ट्रासाठी सितारामण यांनी मुंबई-पुणे, पुणे-हैदराबाद हायस्पिट कॉरिडोअरमुळे जीडीपीत मोठी वाढ होईल, प्रत्येक ग्रोथ हबसाठी 5 हजार कोटी, प्रत्येकी पाच वर्षात प्राप्त होणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर राष्ट्रीय हातमाग धोरण, कारागिरांना प्रोत्साहन यासाठी मेगा टेक्सटाईल पार्क स्थापले जातील, महात्मा गांधी ग्रामस्वराज अंतर्गत खादीला प्रोत्साहन देण्यासाठी उत्पादन प्रशिक्षणाला महत्व दिले जाईल, एक जिल्हा एक उत्पादन याला प्रोत्साहन दिले जाईल. पाच लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या टीअर 2 आणि 3 शहरांच्या विकासासाठी 11.2 लाख कोटींचे वाटप करण्यात आले आहे. 2026-27 मध्ये ही रक्कम 12.2 लाख कोटींपर्यंत वाढवला जाईल. सेमीकंडक्टसाठी 40 हजार कोटींची तरतूद करण्यात आल्याची घोषणा अर्थमंयिंएनी करून ओडीसा, तामिळनाडू अंधप्रदेशात दुर्मिळ पृथ्वी सामग्रीसाठी समर्पित सुविधा स्थापन करण्यासाठी पुढाकारर घेण्यात आल्याचे सांगितले. राष्ट्रीय हातामगाला प्रोत्साहन देण्याचे सांगून शेतीसाठी काही महत्वाच्या घोषणा केल्या. नारळ संशोधन केंद्र स्थापन करण्याची घोषणा केली. यामुळे 3 कोटी शेतकर्यांना याचा लाभ मिळणार असल्याचे सांगीतले. पशूपालन, दूग्धव्यवसायाचे अनुदान वाढवणार असल्याचे सांगितले. काजू, कोकोला जागतिक दर्जा मिळवून देणार असल्याचे सांगत शेतकर्यांच्या उप्तादनसाठी प्रयत्न करणार, पाचशे मत्यस्य एकत्मिक केंद्र उभारणार, कुक्कुटपालन अधिक मजबूत करणार, ईशान्य भारतात बदाम आणि शेंगदाणे उत्पादन वाढवणार, शेतकर्यांच्या उत्पादन वाढीसाठी नवे पर्याय तपासणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पुढे आयुर्वेदिक क्षेत्राला अनन्यसाधारण महत्व देत देशात तीन नवीन आयुर्वेद महाविद्यालये उघडण्याची घोषणा आज निर्मला सीतारामण यांनी केली. फार्मा शिक्षणाला बळ देण्यानुसार तीन नवीन फार्मास्युटिकल शिक्षण संस्था उघडल्या जाणार असल्याचे त्यांनी या वेळी म्हटले. पर्यटन क्षेत्राला अधिक बळकटी मिळावी या उद्देशाने 20 आयकॉन पर्यटन स्थळावरील दहा हजार टूर्स गाईडना प्रशिक्षण देण्यासाठी पायलट योजना जाहीर करण्यात आली. बारा आठवड्याची हायब्रिड ट्रेनिंग प्रोगॅ्रम असून ती आयआयएमच्या सहकार्याने विकसित केली जाणार आहे. 15 पुरातत्वीय स्थळांचा विकास केला जाणार असून इन्कम टॅक्ससाठी नवा नियम लागू करण्यात आल्याचे सांगितले. नवीन आयकर कायदा 1 एप्रिल 2026 पासून लागू करण्यात येणार असून शिक्षण, आरोग्यासाठीचा टीसीएस दर कमी करण्यात आला आहे तो पाच टक्क्यांवरून दोन टक्क्यांवर आणण्यात आला आहे. आयटीआर दाखल करण्याची अंतिम मुदत आयटीआर 1 आणि आयटीआर 2 दाखल करणारे 31 जुलैपर्यंत दाखल करू शकतात. ऑडीट नसणारे व्यवसाय आणि ट्रस्टसाठी रिटर्न दाखल करण्याची अंतिम मुदत ही 31 ऑगस्ट असेल, मालमत्ता विकणार्या एनआरआयसाठी टीडीएस नियमामध्ये बदल केला आहे. पूर्वी आवश्यक असणारा टीएएन आता आवश्यक राडणार नाही. अपघात विम्यावर मिळणार्या रकमेवर आता कुठलाही टॅक्स लागणार नाही, असे निर्मला सितारामण यांनी म्हटले आहे. आयकर स्लॅब जैसे थे ठेवला असून हा अर्थसंकल्प विकसित भारताच्या दिशेने पाऊल टाकणारा अर्थसंकल्प असल्याचे त्यांनी म्हटले








