लिंबारूई शिवारात घडली खळबळजनक घटना
बीड, (रिपोर्टर)ः- पती आपणास मोबाईल घेवून देत नसल्याच्या कारणावरून 24 वर्षीय पत्नीने आपल्या 3 वर्षीय मुलासह स्वतः विहिरीमध्ये उडी घेवून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना बीड तालुक्यातील लिंबारूई शिवारात घडली. घटनेची माहिती पोलिसांना झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. या प्रकरणी मुलाचा खून करून स्वतः आत्महत्या केल्याने मयत पत्नी विरोधात बीड ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राजक्ता उर्फ राधा रामेश्वर दराडे (वय 24 रा.लिंबारूई) या महिलेने आपल्या पतीकडे आपल्या पतीकडे मोबाईलसाठी तगादा लावला होता. आपला पती मोबाईल घेवून देत नसल्याने सदरील महिलेने आपल्या तीन वर्षीय मुलगा वेदांत दराडे यांच्या सह स्वतः लिंबारूई शिवारातील ’बोरी‘ची वाटणी या परिसरातील विहिरीत उडी घेवून आत्महत्या केली. यात दोन्ही माय लेकराचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती बीड ग्रामीण पोलिसांना झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येवून पंचनामा केला. या प्रकरणी पती रामेश्वर दराडे यांनी ग्रामीण पोलिसात फिर्याद दाखल केली. त्यानुसार वेदांत दराडे याचा खुन केल्या प्रकरणी मयत पत्नी प्राजक्ता दराडे हिच्या विरोधात बीड ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा अधिक तपास पोलीसक रत आहेत.





