माजलगाव (रिपोर्टर) उपवर झालेल्या लेकिचे हात पिवळे करण्यासाठी सावकारानेच स्थळ आणले. हुड्डा पाच लाख मागितला. लेकीच कल्याण होतय म्हणून पैसे नसल्याने बापाने त्याच सावकाराकडून साडे आठ लाख रुपये चार रुपये टक्क्याने घेतले. त्याला 32 लाखाच्या जमिनिचे तात्पुरते खरेदीखत करुन दिले. मात्र सावकाराचे पैसे परत करुनही त्यांने परस्पर फेर ओढत जमिन हडप केली. इकडे दहा दिवसातच लेकीलाही परत पाठवले. त्यामुळे जमिनही हडप केली. अन् लग्न होवूनही लेक घरीच असल्याने माझा बाप चिंतेच आहे. तो आत्महत्याचा प्रयत्न करत आहे. त्यांना वाचवा आणि आम्हाला आमची जमिन परत मिळून द्या असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुलीने पाठवले आहे.
पुजा शेखर सावंत (वय 24 वर्षे, रा.कुप्पा, ता.वडवणी. ह.मु. पुनंदगाव ता.माजलगाव जि.बीड) या विवाहित तरुणीने मुख्यमंत्री शिंदे यांना पत्र लिहिले असून त्या पत्रात ती म्हणते की, माझे शिक्षण सुरु असल्याने आणि नौकरी न लागल्याने आई-वडिलांनी माझे लग्न करण्याचे ठरवले. माझे सध्या पैसे नसल्याने आलेल्या स्थळाला पैसे सध्या लग्नासाठी पैसे नाहीत म्हणून घरचेचे नकार देत होते. मात्र त्यानंतर आमच्या गावातील खाजगी सावकार गणेश मारोती वाघमारे यानेच स्थळ आणले. अन् मी देतो पैसे करा लग्न. वडिल म्हणाले. मुलगा चांगला आहे. तर पैसे ठिक आहे. सावकाराने आम्हाला 8 लाख 50 हजार दिले. लग्न जवळ आले अन् सावकराने पैसे चार रुपये टक्क्याने राहुद्या नसता मला दोन एक्कर जमिन नावची करुन द्या. लग्न जवळ आल्याने आमच्या समोर कोणताही पर्याय नव्हता. म्हणून त्यांना आम्ही दोन एक्कर जमिनिचे खरेदी कख तात्पुरते करुन दिले. नंतर माझे लग्न लावून दिले. लग्न झाल्यानंतर त्यांनी मला 10 दिवसात हाकलून दिले. वडिलांनी सावकाराचे पैसे परत करुनही जमिन परत दिली नाही. माझे लग्न लावून दिले. तरी मी घरीच आहे. त्यामुळे माझे वडिल खूप खचले असून त्यांनी तीन वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. आम्हीच त्यांना कसा तरी धिर देत आहोत. मात्र आता माझाही संयम तुटत असून मोठं होवून जगण्यापेक्षा अगोरदरच मेले असते तर आई-वडिलांपुढे एवढे संकट उभे राहिले नंसते. अशा अशायचे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुलीने पाठवले असून आमचे वडिल जिवंत आहेत तोपर्यंत आमची जमिन आम्हाला पतर मिळून द्या अशी मागणी केली आहे.












