Monday, January 24, 2022
No menu items!
HomeUncategorizedविशेष पथक,एलसीबीच्या धाडीने ठाणेप्रमुखांची हाप्तेखोरी उघड

विशेष पथक,एलसीबीच्या धाडीने ठाणेप्रमुखांची हाप्तेखोरी उघड

जे पथकाला दिसत ते ठाणेप्रमुख अन्
बीट अमलदारांना का दिसत नाही?

गणेश जाधव | बीड
९९२२७७३११७


जिल्ह्यात काही हाप्तेखोर पोलिस अन् अधिकार्‍यांमुळेच अवैध धंदे जोरात सुरु आहेत. ठाणेप्रमुख आणि बीट अमलदारांना आपल्या हद्दीतील खडा न् खडा माहित असतो. कोठे किती अन् कोणाचे अवैध धंदे सुरु आहेत. याची इत्तेभूत माहिती त्यांच्याकडे तोड पाट असते. मात्र ते त्यावर कारवाई करत नाहीत. कारण त्यांना त्यांचा वाटा मिळत आहे. मात्र सध्या नव्यानेच स्थापन केलेल्या विशेष पथकाने धाडसत्र मोहिम हाती घेतली असून जिल्ह्यातील अनेक अवैध धंद्यावर मोठ्या प्रमाणात कारवाया केल्या आहेत. स्थानिक गुन्हे शाखाही अवैध धंद्यावर मोठ्या प्रमाणात कारवाया करत आहेत. त्यामुळे जे पथकाला दिसतं ते ठाणेप्रमुख आणि बीट अमलदारांना का दिसत नाही? हा मोठा प्रश्‍न उपस्थित होत असून विशेष पथक आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या धाडीने ठाणेप्रमुखांची मात्र हाप्तेखोरी उघड होत आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देणे गरजेचे आहे.

बीड शहरासह ग्रामीण भागात सर्रासपणे अवैध धंदे सुरु आहेत. स्थानिक पोलिसांच्या आशिर्वादाशिवाय हे अवैध धंदे सुरु राहणे शक्य नाही. मात्र त्यांना त्यांचा वाटा मिळत असल्याने ते कारवाईस पुढे येत नाहीत. वाळू पट्यात तर कोणाचे टिप्पर सुरु ठेवायचे अन् कोणाच्या टिप्परवर कारवाई करायची हे वाळू माफियांच्या सांगण्यावरुन काही स्थानिक पोलिस कारवाई करतात अन् आम्ही वाळू माफियांच्या मुसक्या अवळल्या म्हणून वरिष्ठांपुढे दिखावा करत आहेत.

chor police

खर तर मटका, गुठका अन् वाळू यासारखे अनेक अवैध धंदे हे एक दोन दिवसात सुरु झालेले नसतात. त्यामुळे ते स्थानिक पोलिसांच्या नजरेतून सुटत नाहीत. मात्र हाप्ता दे अन् अवैध धंदा सुरु ठेव असा अलिखीत नियमच काही ठाणे प्रमुख आणि बीट अमलदारांनी सुरु केला आहे. खर तर ज्या ठाण्याच्या हद्दीत विशेष पथक अथवा स्थानिक गुन्हे शाखा धाड टाकते त्या ठाणे प्रमुख आणि बीट अमलदारांची चौकशी होणे गरजेचे आहे. कारण त्याच्या आशिर्वादा शिवाय हे अवैध धंदे वर्षानुवर्ष सुरु राहणे शक्यच नाही.

…तर ठाणे प्रमुख अन् बीट अमलदारांची चौकशी होणे गरजेचे
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बिनबोभाट अवैध धंदे सुरु आहेत. ज्या पोलिस ठाण्यात अवैध धंदे सुरु आहेत त्याची खडान् खडा माहिती ही ठाणेप्रमुख अन् बीट अमलदारांना असते. मात्र ते हाप्ता घेवून त्याला अवैध धंदा करण्यास मनाई करत नाहीत. अनेक पोलिस ठाण्यात हाप्ता वसूल करण्यासाठी दोन तिन कर्मचारी देखील नेमलेले असतात. त्यांना केवळ हाप्ता वसूलीचे काम असते. (एखादाच अवैध धंदा हा पोलिसांना माहित नसतांना सुरु झालेला असतो) अशा अवैध धंद्यावर विशेष पथक आणि स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केल्यास तो धंदा किती दिवसांपासून सुरु होता यावरुन ठाणे प्रमुख आणि बीट अमलदारांची चौकशी होणे गरजेचे आहे.

जिल्ह्यातून दररोज तीन चार दुचाकी लंपास
कोणताही अवैध धंदा पोलिसांच्या परवानगीशिवाय सुरु करणे तेवढे सोपे नाही. मात्र बीड जिल्ह्यात राजरोज पणे सुरु असलेले अवैध धंदे हे पोलिसांना माहितच नाहीत की अर्थपूर्ण त्याकडे दुर्लक्ष होत आहे हे त्यांनाच माहित. सध्या बीड जिल्ह्यातून रोज तीन चार दुचाकी लंपास होत आहे. त्याच्या रितसर तक्रारी देखील त्या त्या पोलिस ठाण्यात दाखल आहेत. मात्र गेल्या दोन चार महिन्यांपासून या टोळीचा पोलिसांना तपास लागत नसल्याने आर्श्‍चय व्यक्त केले जात आहे.

अवैध धंदे कोणाचे
सध्या बीड जिल्ह्यात सुरु असलेल्या अवैध धंद्यामध्ये सर्वात पुढे पुढारी, पोलिस अन् पत्रकार आहेत. वाळू माफियामध्ये या तीघांचा नंबर लागत आहे. पोलिसांनी वाळुचे टिप्पर पकडले तर ते बड्या पुढार्‍याचं त्याच्या कार्यकर्त्यांच किंवा पोलिसांच असतं. त्या तोघांच नसलं तर ते पत्रकारांच असतंच असतं त्यामुळे पोलिसांनाही कारवाई कोणावर करावी हा प्रश्‍न उपस्थित होत आहे. मात्र या सर्वांकडून वेळेवर हाप्ता घेवून अवैध वाळू उपसा अन् वाहतूकीला पोलिस अलिखीत परवानगी देतात.

महत्वाचे तपास एलसीबीकडे
देवून ठाणेप्रमुख निवांत

काही ठाणेप्रमुखांच्या हाप्तेखोरीमुळेच अवैध धंदे वाढत आहेत. अन् त्याच अवैध धंद्यामुळेच जिल्ह्यात दरोडा, खून, बलात्कारासारख्या घटना घडत आहेत. यातील महत्वाच्या तपासात ‘डोक’ न लावता तो स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करुन हाप्तेगिरीसाठी अनेक ठाणेप्रमुख निवांत राहत असल्याचे चित्र सध्या बीड जिल्ह्यात दिसून येत आहे.

कारवाईचे आदेश आल्यास हातभट्टीवालेच दिसतात
अवैध धंदे वाढल्याची ओरड झाल्यास वरिष्ठांकडून अवैध धंद्यावर कारवाई करण्याच्या सूचाना ठाणेप्रमुखांना दिल्या जातात. मात्र अशावेळी जिल्ह्यातील मटका किंग, गुटका, वाळू यासह अनेक अवैध धंद्यावाले पोलिसांना दिसत नाहीत. मात्र दर्‍याखोर्‍यात हातभट्टी बनवणारे पटकण दिसतात. काही वेळा तर त्यांना फोन करुन ठाण्यात बोलवतात अन् ‘तुझ्यावर हातभट्टीचा गुन्हा दाखल करायचा आहे’ असे म्हणून कारवायाचा अकडा वाढत वरिष्ठांपुढे दिखावा केला जात आहे.

Most Popular

error: Content is protected !!