Tuesday, September 21, 2021
No menu items!
Homeक्राईमयापुढे गेवराई तालुक्यात ट्रॅक्टरने होणार वाळूची वाहतूक हायवा,टिप्परला बंदी

यापुढे गेवराई तालुक्यात ट्रॅक्टरने होणार वाळूची वाहतूक हायवा,टिप्परला बंदी

आ.पवारांच्या लढ्याला यश
गेवराई (रिपोर्टर):- वाळू ठेक्यावरून वाळू उपसा करणार्‍या अवजड वाहनांमुळे मतदार संघातले रस्ते खराब होत असल्याची तक्रार करत उपोषणाला बसणारे आ.लक्ष्मण पवार यांच्या मागणीला यश आले असून आता गेवराई तालुक्यात अवजड वाहनाऐवजी ट्रॅक्टरद्वारे वाळू नेण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी संबंधित वाळू ठेकेदारांना दिले आहेत. गेल्या सहा महिन्यापासून आ.पवार या प्रकरणी लक्ष घालून होते.


गेवराई तालुक्यातील वाळू ठेक्यावरून अवजड वाहनाने वाळूची वाहतुक केली जात असायची. त्यामुळे मतदार संघातले रस्ते मोठ्या प्रमाणावर खराब होतात. म्हणून आ.लक्ष्मण पवार यांनी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देवून ट्रॅक्टरद्वारे वाळूची वाहतुक करावी अशी मागणी केली होती. याबाबत त्यांनी गेवराई येथे उपोषणही केले होते. मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याचे पाहून आ.पवारांसह नायगावचे आ.राजेश पवार यांनी मंत्रालयाच्या दारामध्ये या प्रकरणी आवाज उठवत उपोषण केले होते. राज्य सरकारने आ.लक्ष्मण पवार यांच्या मागणीचे अखेर गंभीर दखल घेतली आणि गेवराई तालुक्यातील वाळू उपसा व वाळू वाहतुक करतांना अवजड वाहनांना अर्थात हायवा, टिप्पर यांना बंदी घातली. यापुढे ट्रॅक्टरद्वारे वाळूची वाहतुक करावी असे सुचित करण्यात आले. त्यानुसार जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी गेवराई तालुक्यातील वाळू ठेकेदारांना आदेश काढत गेवराई तालुक्यात ट्रॅक्टरद्वारे वाळूची वाहतुक करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत. आ.लक्ष्मण पवारांच्या मागणीला यश आले असून वाळू ठेकेदारांना मात्र या आदेशाने जबरदस्त चपराक बसली आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!