Monday, June 14, 2021
No menu items!
Homeकोरोनाआरोग्य, पोलीस खात्यातील अधिकारी-कर्मचार्‍यांसाठी बारामती ऍग्रोकडून एनर्जी ज्यूस

आरोग्य, पोलीस खात्यातील अधिकारी-कर्मचार्‍यांसाठी बारामती ऍग्रोकडून एनर्जी ज्यूस


बीड (रिपोर्टर):- कोरोनाच्या महामारीमध्ये अहोरात्र काम करणार्‍या आरोग्य व पोलीस खात्यातील अधिकारी, कर्मचार्‍यांना बारामती ऍग्रो तर्फे ओआरएस एनर्जी ज्युस आज आ.संदिप क्षीरसागर यांच्याहस्ते देण्यात आले. आ.रोहित पवार यांनी बीड जिल्ह्यातील आरोग्य व पोलीस खात्यातील अधिकारी, कर्मचार्‍यांसाठी हे एनर्जी ज्युस पाठवले आहे.


गेल्या कित्येक महिन्यापासून आरोग्य विभागातील कर्मचारी आणि पोलीस खात्यातील अधिकारी कर्मचारी कोरोनाच्या वैश्‍विक महामारीतत रात्रन्‌दिवस काम करत आहेत. एकीकडे जिल्हाभरातला सर्वसामान्य दारबंद असतांना दुसरीकडे मात्र या कर्मचार्‍यांना आपले कर्तव्य करावे लागत होते. अशा परिस्थितीत या अधिकारी, कर्मचार्‍यांची आरोग्याची काळजी घेत जामखेडचे आ.रोहित पवार यांनी बीड जिल्ह्यातील या अधिकारी, कर्मचार्‍यांसाठी बारामती ऍग्रोसाठी ओआरएस एनर्जी ज्युस पाठवले. आज आ.संदिप क्षीरसागर यांच्या उपस्थितीत अधिकारी कर्मचार्‍यांना एनर्जी ज्युस प्रदान करण्यात आले. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक सुर्यकांत गिते यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!