Wednesday, September 22, 2021
No menu items!
HomeUncategorizedनिवासी वैद्यकीय डॉ. राठोडचा मनमानीपणा कारण न देताच गरजू कर्मचार्‍याला कमी केले

निवासी वैद्यकीय डॉ. राठोडचा मनमानीपणा कारण न देताच गरजू कर्मचार्‍याला कमी केले


बीड (रिपोर्टर):- जिल्हा रुग्णालयातील निवासी वैद्यकीय धिकारी डॉ. सुखदेव राठोड हे अनेक कामात स्वत:चा मनमानीपणा करतात. काही ठिकाणी तर ते जिल्हा शल्यचिकित्सकांना अंधारात ठेवून स्वत:च निर्णय घेतात. असाच प्रकार त्यांनी काही दिवसांपुर्वी केला असून शासकीय आयटीआय या ठिकाणी हॉस्पिटल मॅनेजर म्हणून काम करणार्‍या श्रीमती जाधवर यांना कोणतेही कारण नसताना कामावरून कमी केले आहे. श्रीमती जाधवर या अतिशय गरीब कुटुंबातील असल्याने त्यांच्या उपजिविकेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.


श्रीमती राजश्री अभिमान जाधवर या ४ जूनपासून शासकीय आयटीआय या ठिकाणी हॉस्पिटल मॅनेजर म्हणून काम करतात. त्यांनी यापुर्वीही पाटोदा या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयामध्ये काम केलेले आहे. त्यांचे काम चांगले असताना आणि सर्व शैक्षणिक पात्रता असताना सुद्धा राठोड आणि डॉ. शहाणे यांच्या मर्जीतील व्यक्तीला हॉस्पिटल मॅनेजर या पदावर घेण्यासाठी कोणतीही नोटीस न देता किंवा जाधवर यांना सूचना न देता डॉ. शहाणे यांनी दूरध्वनीवर प्रतिक्षा यादीतील व्यक्ती काम करायला तयार आहे त्यामुळे तुम्हाला कामावरून कमी करण्यात येत आहे, असे तकलादू कारण सांगत डॉ. राठोड यांनी शासकीय जिल्हा रुग्णालयाला स्वत:ची मालमत्ता समजत कामाची आणि नोकरीची गरज असणार्‍या श्रीमती जाधवर यांना कामावरून कमी केले आहे. वास्तविक पाहता श्रीमती जाधवर या जिल्हा शल्यचिकित्सक गित्ते यांनाही भेटल्या होत्या त्यावेळी गित्ते यांनी डॉ. राठोड यांना जाधवर यांना कामावरून कमी करू नका, त्यांना काम करू दद्या, असे सांगितले असतानाही डॉ. राठोड हे कोणत्या आविर्भावात वावरतात हे समजून येत नाही. त्यामुळे जाधवर यांनी आपल्यावर झालेल्या अन्यायासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्याकडे दाद मागितली आहे.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!