Saturday, October 23, 2021
No menu items!
Homeबीडपरत द्या,परत द्या,आरक्षण परत द्या! राज्यात भाजप आक्रमक,ओबीसींचा रस्त्यावर ठिय्या कात्रज बायपासवर...

परत द्या,परत द्या,आरक्षण परत द्या! राज्यात भाजप आक्रमक,ओबीसींचा रस्त्यावर ठिय्या कात्रज बायपासवर पंकजांचा तर परळी प्रितम मुंडेंचा ठिय्या


बीड,आष्टी,पाटोदा,केज,परळी,गेवराई,वडवणीसह अन्य ठिकाणी जिल्ह्यात रस्ता रोको
बीड | ठिकठिकाणच्या रिपोर्टरकडून
स्थानिक स्वराज्य संस्थेतील राजकीय आरक्षण न्यायालयाने रद्द केल्यानंतर भारतीय जनता पार्टी आक्रमक होत आज रस्त्यावर उतरली. राज्यभरात चक्काजाम आंदोलन करत परत द्या, परत द्या आरक्षण परत द्याच्या घोषणा देत जेलभरो आंदोलन केले. पुण्याच्या कात्रज बायपासवर भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडेंनी ठिय्या मारत आंदोलन केले. तर ईकडे बीड जिल्ह्यात ओबीसी समाजाने आक्रमक होत रस्त्यावर उतरून ठिकठिकाणी आंदोलन केले. परळीत खा.प्रितम मुंडे, गेवराई आ.लक्ष्मण पवार, आष्टीत आ.सुरेश धस, भीमसेन धोंडे, बीडमध्ये राजेंद्र मस्के, केजमध्ये आ.नमिता मुंदडा यांनी ठिय्या मांडून रस्तारोको केल्याने तालुका ठिकाणच्या मुख्य रस्त्यावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. अनुचीत प्रकार घडू नये म्हणून ठिकठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला हाते.

आरक्षण मिळेपर्यंत निवडणूका होवू देणार नाही -पंकजा मुंडे

स्थानिक स्वराज्य संस्थेतील राजकीय आरक्षण न्यायालयाने रद्द केल्यानंतर भाजपाच्या राष्ट्रीय सचिव आक्रमक होत राज्यभर चक्काजाम आणि जेलभरोची हाक दिली. आज त्यांनी कात्रज बायपासवर ठिय्या मारत चक्काजाम आंदोलन केले. यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या की, जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत निवडणूका होवू देणार नाही. सरकारच्या नाकार्तेपणामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण गेले. गेली पंधरा महिने वेळ काढुपणा सरकारने केल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Most Popular

error: Content is protected !!