धक्कादायक : गळा कापून महिलेचा मृतदेह विहिरीत फेकला
बीड । रिपोर्टर
बीड । प्रतिनिधी
गळा कापून एका 32 वर्षीय महिलेचा मृत्तदेह विहिरीत फेकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना पिंपळनेर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कुक्कडगाव परिसरात आज सायंकाळी उघडकीस आली. पिंपळनेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून मृत्तदेह विहिरीबाहे काढण्याचे काम सुरु आहे. अद्याप पर्यंत मृत्तदेहाची ओळख पटलेली नाही.
गणेश आठवले यांची कुक्कडगाव (ता. बीड) शिवारात शेती आहे. त्यांच्या शेतात विहिर असून या विहिरीमध्ये एक मृत्तदेह असल्याची माहिती नागरिकांना मिळाल्यानंतर घटनास्थळी पिंपळनेर पोलिस ठाण्याचे प्रमुख कैलास भारती , पीएसआय खरात, बीट अमलदार मेखले यांनी धाव घेतली. मृत्तदेह विहिरीबाहेर काढणे सुरु आहे. अंदाजे 30 ते 32 वर्षाच्या महिलेचा अज्ञात व्यक्तिने गळा चिरुन मृत्तदेह विहिरीत फेकला असावा असा आंदाज व्यक्त केला जात आहे. आंदाज व्यक्त केला जात आहे.