Tuesday, December 1, 2020
No menu items!
Home बीड माजलगाव माजलगावचे बंद पडलेले जलशुध्दीकरण केंद्र अखेर सुरू

माजलगावचे बंद पडलेले जलशुध्दीकरण केंद्र अखेर सुरू

येत्या आठवड्यापासून मिळणार शहरवासीयांना शुध्द पाणी-नगराध्यक्ष शेख मंजुर
माजलगाव(रिपोर्टर)ः येथील नगर परिषदे मार्फत शहराला पाणी पुरवठा करणारे जलशुध्दीकरण केंद्र मागील दिड वर्षापासून तांत्रिक बिघाडामुळे बंद होते. परंतू नुकतेच नगराध्यक्षपदाची सुत्रे घेवून शेख मंजुर यांनी बंद पडलेले जलशुध्दीकरण केंद्राच्या दुरूस्तीचे काम सुरू केले असून ते प्रगतीपथावर आहे. त्यामुळे येत्या आठवड्यापासून शहरवासीयांना शुध्द पाणी पुरवठा सुरळीत होणार असल्याची माहिती नगराध्यक्ष शेख मंजुर यांनी दिली.
माजलगाव नगर परिषदेचे शहरवासीयांना पाणी पुरवठा करणारे जलशुध्दीकरण केंद्र मागील दिड वर्षापासून बंद होते. त्यामुळे कोरोना सारख्या महामारीत दुषित पाणी पिण्याची पाळी शहरवासीयांवर आली होती. यावर वृत्तपत्रांच्या माध्यमातून पत्रकारांनी लक्ष वेधले होते. परंतू नगर परिषद प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष करण्यात आले. मात्र नवनिर्वाचित नगराध्यक्ष शेख मंजुर यांनी प्रथम प्राधान्य देत दुरूस्तीचे काम मागील आठवड्यात हाती घेतले. त्याकरिता एका खाजगी एजन्सीला काम देवून रात्र-दिवस काम करून घेतले. हे काम आजमितीस प्रगतीपथावर आलेले आहे. या निमीत्ताने गुरूवार दि.१९ रोजी सायं.५ वा. नगराध्यक्ष शेख मंजुर यांच्यासह न.प.गटनेते रोहण घाडगे, सुशांत पौळ, विजय शिंदे, पत्रकार यांनी जलशुध्दीकरण केंद्रास भेट देवून कामाची पाहणी केली. याप्रसंगी बोलतांना नगराध्यक्ष शेख मंजुर यांनी सांगीतले की, शहराला पाणी पुरवठा करणार्या जलशुध्दीकरण केंद्रात चार फिल्डर प्लॅन्ट कार्यरत असून त्यातील एक चालु झालेला असून उर्वरीत तीन फिल्टर प्लॅन्टचे काम प्रगतीपथावर आहे. शहराची लोकसंख्या पाहता दररोज ९६ लाख लिटर पाणी लागते. त्यानूसार या फिल्टरव्दारे १ कोटी लिटर पाणी जलशुध्दीकरण प्राप्त होते. जलशुध्दीकरण केंद्रात एका तासाला १२ लाख लिटर पाणी शुध्द होणार आहे. तेव्हा दिवसाला लागणारे ९६ लाख लिटर पाणी दररोज तयार करू शकत आहोत, परंतू मागील अनेक महिण्यापासून विस्कळीत झालेल्या तांत्रिक अडचणीमुळे दररोज पाणी देवू शकत नाहीत. परंतू येत्या. आठ दिवसात चार दिवसाला जलशुध्दीकरण केंद्राव्दारे शुध्द पाणी पुरवठा सुरळीत करणार आहोत. त्याच बरोबर शहरातील पाईप लाईन लिकेजचे काम सुरू केलेले असून ते येत्या आठ दिवसात पुर्णत्वास जाईल. तेव्हा शहरवासीयांनी आप-आपल्या नळाला तोट्या बसवून वाया जाणार्या पाण्याची नासाडी टाळावी व नगर परिषद प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्ष शेख मंजुर यांनी केले. यावेळी नगर परिषद पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Most Popular

पिसाळलेल्या बिबट्याच्या हल्ल्यात तिसरा बळी जोगेश्वरी पारगांव येथील महिला ठार

पांगुळगव्हाण येथील शेतकरी प्रसंगसावधनाने हल्ल्यात बचावले नागरिकांमध्ये बिबट्याची दहशत कायम तात्काळ जेरबंद करण्याची मागणी

बिबट्याला पकडण्यासाठी ताडोबा जंगलातले एक्सपर्ट आष्टीत

बिबट्या पाथर्डी परिसरातून आला, सकाळपासून कोम्बिंग ऑपरेशन सुरूआष्टी/बीड (रिपोर्टर)- नरभक्षक बिबट्याने आतापर्यंत तिघा जणांचा बळी घेतल्याने आष्टीसह पाटोदा आणि शिरूर तालुक्यात एकच...

महाविकास आघाडीच्या एकजुटीमुळे सतिष चव्हाण करणार विजयाची हॅट्रीक

सुजान पदवीधर मतदारांची सतिष चव्हाणांनाच सर्वत्र साथगेवराई (रिपोर्टर)-महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी कॉंग्रेस, इंदिरा कॉंग्रेस आणि शिवसेना तसेच इतर मित्रपक्षांच्या एकजुटीमुळे सतिष चव्हाण विजयाची...