Friday, January 28, 2022
No menu items!
Homeबीडआष्टीदहशत, दादागिरी, गुंडगिरीला भिऊ नका शेतकरी पुत्र म्हणुन आष्टीच्या विकासाची जबाबदारी...

दहशत, दादागिरी, गुंडगिरीला भिऊ नका शेतकरी पुत्र म्हणुन आष्टीच्या विकासाची जबाबदारी माझ्या खांद्यावर – ना. धनंजय मुंडे

आष्टी रिपोर्टर

268137780 389241756309721 8766425139963490013 n

आमची औकात काढणार्‍यांना परळीच्या जनतेने दाखवलं. इथंही आमची औकात काढली गेली, आष्टीच्या जनतेनेही दाखवून दिलं. आता थांबायचं नाही, दहशत, गुंडगिरी याला भ्यायचं नाही, आजबे काका तुमच्यात नसलेला रगेलपणा बाहेर काढा, इथं बसलेल्या हजारोंचा रगेलपणा बाहेर येईल. पाणी देणं, नाल्या काढणं, स्वच्छता राखणं हा विकास नाही, ते कर्तव्य आहे. लोकांचा आर्थिक स्तर ज्याने वाढतो, तो खरा विकास आहे. उद्याच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला निवडून द्या, असे आवाहन राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी केले. ते आष्टी येथे आयोजीत महाविकास आघाडीच्या प्रचारा प्रसंगी बोलत होते. या वेळी व्यासपीठावर अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, संजय तटकरे, आ. बाळासाहेब आजबे, मा.आ.साहेबराव दरेकर, काँग्रेस विधानसभा अध्यक्ष रविंद्र ढोबळे,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बीड जिल्हा उपाध्यक्ष सतिश शिंदे, डॉ.शिवाजी राऊत,भाऊसाहेब लटपटे, काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष मीनाक्षी पांडूळे, आण्णासाहेब चौधरी, डॉ. विलास सोणवने, सुनिल नाथ,राम खाडे, नदीम शेख, विनोद निंबाळकर, संदीप आस्वर, परमेश्‍वर शेळके, भाऊ घुले, भरत भवर उपस्थित होते. पुढे बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की, आमच्या बहिणबाई म्हणाल्या, 32 नंबरचं खातं दिलं, त्यांची औकात काय. माझ्यावर काय टीका करायच्या त्या करा, कुठल्या थराला जायचे ते जा, खात्यावर काय टीका करता, हा माझा अपमान नाही तर सामाजिक न्याय विभागाअंतर्गत येणार्‍या तमाम जातींचा अपमान आहे. पवार साहेबांनी माझ्यावर जी जबाबदारी टाकली ती विश्‍वासातून. 32 नंबरचं खातं दिलं ते एक नंबरवर घेऊन जाऊ शकतो, हा विश्‍वास पवार साहेबांना होता आणि तो विश्‍वास सार्थकी लावला. खात्याअंतर्गत राज्यातले 35 टक्केपेक्षा जास्त लोक संपर्कात असतात. टीका करायला मिळाली नाही म्हणून काही तरी टीका करायची आणि अखंड दिन-दलित, पथदलित वंचितांचा अपमान करायचा. आचारसंहिता होऊ द्या, आठ दिवसात आष्टीत शंभर कोटींचे विकास कामे करू, अशी घोषणा करत ना. मुंडेंनी इथं पोटात घुसून पोट फाडणारा माणूस आहे, त्याच्यापासून जपून रहा. गल्ली ते दिल्ली भाजप असणार्‍या पार्टीला केजमध्ये एक ठिकाणीही कमळ दिसलं नाही. तिथं उमेदवार नाही, इथंही तीन ठिकाणी कमळावर निवडणूक लढवण्याची हिम्मत दाखवता आली नाही. आम्ही आज कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांना शिव्या देतोत, मात्र इथं काही दिवसांपुर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा चौक पहाटे पाडून टाकला. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यातून सुराज्य निर्माण केलं, अशा माणसाच्या नावाचा चौक पाडला जातो, तुम्हाला राग येत नाही का? 1999 पासून पीक विम्याला सुरुवात झाली मात्र प्रथमच बीड जिल्ह्यात सोयाबीनचा 25 टक्के विमा अ‍ॅडव्हान्स घेतला. 500 कोटींपेक्षा जास्तीचा विमा बीड जिल्ह्याला दिला, तुम्ही काय केलं? 12 डिसेंबर 2014 रोजी स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड महामंडळाची स्थापना केली, पुन्हा बंद केलं, पाच वर्षांमध्ये ते चालू करता आलं नाही ते आम्ही चालू केलं. असं म्हणत रस्ता रुंदीपेक्षा जास्त करायचा नाद का लागला? हाफ चड्डीवर फिरायचे काय? हात जोडून सांगतो, आताची संधी गेली, नगरपंचायत महाविकास आघाडीच्या ताब्यात आली नाही तर ब्रह्मदेव आला तरी विकास होऊ शकणार नाही. त्यामुळे उद्याच्या निवडणुकीत आपल्या उमेदवारांना निवडून द्या, शेतकरी पुत्र मंत्री म्हणून आष्टीच्या विकासाची जबाबदारी माझ्या खांद्यावर आहे. तुमचा विकास हाच माझा ध्यास असल्याचे धनंजय मुंडेंनी या वेळी म्हटले.

Most Popular

error: Content is protected !!