रॅली आज नेकनूर मुक्कामी, 51 कि.मी.चा प्रवास करून उद्या बीडमध्ये
मस्साजोग, (रिपोर्टर)ः- मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या समोर
हत्या झाली असा नव्हे तर शहिद हा शब्द लागू शकतो. त्यांचा जो बळी गेलाय तो एका प्रवृत्तीच्या विरोधात गेला आहे. त्या प्रवृत्तीला नष्ट करण्याचा विडा आपण सर्वांनी उचलायला हवा त्यामुळेच काँग्रेसच्या वतीने सद्भावना रॅली काढण्यात आली असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगत भारताच्या डीएनए मध्ये आणि भारताच्या संविधानामध्ये देखिल सद्भावना असल्याचे सपकाळी यांनी म्हंटले. संतोष देशमुख हत्या प्रकरणात संदर्भात काँग्रेसच्या वतीने मस्साजोग ते बीड अशी सद्भावना रॅली काढण्यात येत आहे. आज सकाळी ही रॅली काढण्यात आली. यावेळी काँग्रेस प्रदेशअध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, खा.रजनीताई पाटील, माजी मंत्री अशोक पाटील यांच्यासह आदी उपस्थित होते. आज रात्री ही रॅली नेकनूर येथे मुक्कामी असणार आहे. उद्या 51 कि.मी चा प्रवास करू ही रॅली बीडमध्ये डेरेदाखल होणार आहे.

आज सकाळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, खा.रजनीताई पाटील, माजी मंत्री अशोक पाटील यांच्यासह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत देशमुख कुटूंबीयांची भेट घेत ध्वजारोहन करत या रॅलीला सुरूवात झाली. हातात तिरंगा ध्वज घेत ही रॅली सुरू झाली. तत्पुर्वी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. ही रॅली बीडच्या दिशेने निघाली असून या रॅलीचा उद्देश समाजा समाजामध्ये सद्भावना निर्माण करणे असल्याचे प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी म्हंटले.

तोडा फोडा आणि राज्य कराची प्रवृत्ती संपूष्टात आली पाहिजे, देशमुख कुटूंबियांना सद्भावनेचे संरक्षण आणि रक्षण केले आहे. या सदभावनेचा ठेवा आणि त्यांचा संदेश आपण सर्वांनी आत्मसाद करायला हवा. राज्यात रोज वेगवेगळ्या घटना घडत आहेत त्यामुळे आपला समाज बधीर झालाय का? असा प्रश्न सपकाळ यांनी उपस्थित केला.आपण साधू संताचे महापुरूषांचे , संविधानाचे नाव घेतो त्यावेळी सर्वांची शिकवण ही सदभावनाच असल्याचे आपल्या लक्षात येते. या सदभावनेच्या विरोधात कोण आहे. याचा थोडा विचार केल्यास तोडा फोडा आणि राज्य करा ही प्रवृत्ती या विरोधात असल्याचे दिसून येते.
ही प्रवृत्ती आज जाती जाती तेढ निर्माण करत असल्याचे त्यांनी म्हंटले. पुढे बोलतांना ते म्हणाले, अलीकडच्या काळात कोणत्याही निवडणूका नाहीत तरी देखिल शुध्द स्वरूपात आमची ही पदयात्रा आहे. कु्रर पध्दतीने हसून गुन्हेगार हत्या करतात. हा समाज कसा निर्माण झाला, यामुळे माझ्या मनात देखिल मला शर्मींदा होण्याची वेळ आली आहे. त्यामुळे माझ्या संवेदना देशमुख कुटूंबियाप्रति व्यक्त करतो. तसेच ही सदभावना ज्यांनी जोपासली त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो. हीच भावना आपल्या लोकशाहीची, संरक्षक असल्याचेही सपकाळ यांनी सांगितले.












