परळी (रिपोर्टर) अज्ञात वाहनाने ऑटो रिक्षाला जोराची धडक दिल्याने या अपघातात दोघे जण ठार झाल्याची घटना शहरातील उड्डाण पुलावर घडली.
राजेश सखाराम पोटभरे (वय 25 वर्षे) आणि आशिष ताटे हे दोघे ऑटोरिक्षाने जात होते. रात्री दोन ते तीन वा.च्या सुमारास त्यांना अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. या अपघातात राजेश पोटभरे (ऑटोचालक) जागीच ठार झाला तर आशिष ताटे हा अंबाजोगाई येथील रुग्णालयात उपचारा दरम्यान मरण पावला. या प्रकरणी अज्ञात वाहन चालका-विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.