Thursday, January 20, 2022
No menu items!
Homeकोरोनाचिंताजनक : जिल्ह्यात आज ६४ पॉझिटिव्ह, सोशल डिस्टन्स पाळा, मास्क वापरा

चिंताजनक : जिल्ह्यात आज ६४ पॉझिटिव्ह, सोशल डिस्टन्स पाळा, मास्क वापरा


बीड (रिपोर्टर)- तिसर्‍या लाटेत बीड जिल्ह्यात रुग्णसंख्या झपाट्याने वाढू लागली आहे. काल आलेल्या अहवालात ४५ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले होते तर आजचा आकडा थेट ६४ वर जावून पोहचला आहे. गेल्या चार-पाच दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. दिवसेंदिवस वाढत जाणारा कोरोनाचा आकडा पाहता सदरची बाब ही जिल्ह्यासाठ अत्यंत चिंताजनक असून कोरोनाला रोखण्यासाठी नागरिकांनी स्वत:हून सोशल डिस्टन्स पाळून मास्क वापरावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

तिसर्‍या लाटेत बीडकरांचीही चिंता वाढू लागली आहे. आज आलेल्या २ हजार २६५ संशयितांमध्ये ६४ जण पॉझिटिव्ह तर २ हजार २०१ जण निगेटिव्ह आढळून आले आहेत. पॉझिटिव्हमध्ये अंबाजोगाई ११, आष्टी १३, बीड ५, धारूर २, गेवराई १, केज ३, माजलगाव ५, परळी १६, पाटोदा ३, शिरूर १ आणि वडवणी तालुक्यात ४ रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यात कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे. गेल्या पंधरा दिवसांपुर्वी एकअंकी असलेला जिल्ह्याचा आकडा आता दोन अंकावर तोही शंभरी गाठण्याच्या तयारीत दिसून येत असल्याने जिल्ह्यासाठी ही बाब चिंताजनक आहे. जिल्ह्यात जमावबंदीसह अन्य निर्बंध लावलेले असताना त्याची अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून येते. त्याचबरोबर विनामास्क फिरणारे नागरिक आणि सोशल डिस्टन्सचा ठिकठिकाणचा फज्जा हा कोरोना वाढीला प्रोत्साहन देणारा ठरत आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!