
सात लाखाचे दागिने पळविले
बीड (रिपोर्टर)ः-घरी कोणी नाही या संधीचा फायदा उचलत अज्ञात चोरट्याने घराचे कूलुप तोडून आतमध्ये प्रवेश करत घरातील धान्याच्या कोटीत ठेवलेले सात लाख रुपयाच्या सोन्याचे दागीने व नगदी तिस हजार असा सातलाख तिस हजार रुपयाचा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना वडवणी तालुक्यातील डुकडेगांवात घडली. या प्रकरणी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्रीराम पांडूरंग बडे रा.डुकडेगांव हे आपल्या मुलीस अंबाजोगाई येथील रुग्णालयात प्रसुतीसाठी घेवून गेले होते. त्यांच्या सोबत त्यांची पत्नीही होती. घरी कोणी नसल्याचे पाहून अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश करत घरातील धान्याच्या कोटीत ठेवलेले सात तोळे सोन्याचे दागिने आणि नगदी तिस हजार रुपये असा ऐकूण सात लाख तिस हजार रुपयाचा एैवज चोरुन नेला आहे. घरी आल्यानंतर बडे यांना आपल्या घरी चोरी झाल्याचे निर्देशनास आले. त्यांनी या प्रकरणी वडवणी पोलीसात तक्रार दाखल केली. त्यानुसार अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.








