बीड (रिपोर्टर):अवघ्या महाराष्ट्राला हादरवून सोडणार्या राज्यातील शिक्षक भरती घोटाळा प्रकरणात नेमलेल्या एसआयटीला मराठवाड्यातील क्षिकांचा बोगसपणा उघडीस आणण्यासाठी आणखी तीन महिन्यांचा वेळ वाढवून दिल्याने मराठवाड्यातल्या बोगस शिक्षकांसह या भरती प्रकरणात हात ओले केलेल्या संस्था चालकांसह शिक्षणाधिकार्यांचे धाबे दणाणले आहेत. नागपूर, नाशिक विभागात शिक्षण उपसंचालांपासून शिक्षांपर्यंत गुन्हे दाखल होत त्यांच्यावर अटकेची कारवाई झालेली आहे. बीड जिल्ह्यातही शिक्षकांची मोठ्या प्रमाणावर बोगस भरती झाल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे जिल्ह्यातील बोगस शिक्षकांसह शिक्षण विभागातील अधिकारी आणि संस्था चालकांची झोप पुन्हा एदा उडाली आहे.
राज्यात खासगी अनुदानीत शिक्षण संस्थांमधील शिक्षक भरती घोटाळ्याचं प्रकरण उघडकीस आलं. नागपूर, नाशिकमध्ये सर्वप्रथमच याची ओरड झाली. संस्था चालकांनी शिक्षण विभागातील भ्रष्ट अधिकर्यांच्या संगनमतातून शिक्षकांच्या वैयक्तिक मान्यतेवर बोगस सह्या केल्या. त्यांच्या नियुक्त्यापासून ते इंक्रीमेंट काढण्यापर्यंत शासनाला कोट्यवधी रुपयांना चुना लावला. हे प्रकरण अधिकच गंभीर होत चालल्याने राज्य शासनाने या प्रकरणी पुणे येथील विभागीय आयुक्त पुलगुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन केली. या एसआयटीने या प्रकरणाचा तपास केल्यानंतर धक्कादायक बाबी समोर आल्या. नागपूर, नाशिक भागात उपसंचालकापासून शिक्षकांपर्यंत अनेक जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले, त्यांना अट झाली. त्या भागात ज्या पद्धतीने बोगसगिरी आणि भ्रष्टाचार झाला त्याचपद्धतीने मराठवाड्यासह बीड जिल्ह्यामध्ये ही बोगसगिरी आणि भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात एसआयटीच्या निदर्शनास आला. परंतु कमी वेळेत हा तपास पूर्ण कगरता येत नसल्याचे लक्षात आल्यानंतर एसआयटीने या प्रकरणी शासनाकडे आणखी वेळ मागितला. अकेर काल उपसचिव तासिलदार यांच्या सहीनीशी एक आदेश निघाला. एसआयटीला तब्बल 7 जूनपर्यंत याकामी वेळ वाढवून देण्यात आला आहे. त्यामुळे मराठवाड्यासह बीड जिल्ह्यातल्या भ्रष्ट अधिकर्यांसह बोगस शिक्षकांचे धाबे दणाणले आहेत.











