• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home बीड

नारी शक्ती न भूतो ना भविष्यती; धर्मांधांचं भूत महिलांच्या मोर्चापुढे मूक; केंद्रातल्या मोदी सरकारविरुद्ध बीडमध्येमहिला आक्रमक; आम्ही अखंड स्वतंत्र भारताच्या, मग दुजाभाव का?

by Beed Reporter
September 15, 2022
Reading Time: 1 min read
0
नारी शक्ती न भूतो ना भविष्यती; धर्मांधांचं भूत महिलांच्या मोर्चापुढे मूक; केंद्रातल्या मोदी सरकारविरुद्ध बीडमध्येमहिला आक्रमक; आम्ही अखंड स्वतंत्र भारताच्या, मग दुजाभाव का?
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

नारी शक्ती न भूतो ना भविष्यती
धर्मांधांचं भूत महिलांच्या मोर्चापुढे मूक
केंद्रातल्या मोदी सरकारविरुद्ध बीडमध्येमहिला आक्रमक
आम्ही अखंड स्वतंत्र भारताच्या, मग दुजाभाव का?
महिलांच्या संतप्त प्रश्‍नावर व्यवस्था स्तब्ध
संविधान बचावची चिंगारी देशात वणवा बनणार
बीडच्या मोर्चामध्ये लाखोंचा समावेश
मोर्चेकर्‍यांची शिस्त वाखाणण्याजोगी
बीड (रिपोर्टर) केंद्र सरकारच्या उरात धडकी भरावी, सत्यासाठी, न्यायासाठी एकतेची मूठ वळली जावी. धर्मांधांच्या मनसुब्यांना मुठमाती द्यावी आणि पुन्हा एकदा अखंड स्वतंत्र भारतामध्ये शांतता प्रस्थापित व्जहावी, या यथोचीत मुख्य मागण्यांसह बिल्कीस बानो प्रकरणातील माफ केलेली बलात्कार्‍यांची शिक्षा रद्द करत पुन्हा त्यांना शिक्षा द्यावी, अल्पसंख्याक समाजावर होणारे अन्याय थांबावेत, मुस्लिम समाजाच्या लोकांवर होणारे हल्ले तांबवावेत समाजाच्या रक्षणासाठी महत्वपुर्ण कायदा करावा, या प्रमुख मागण्या घेऊन आज बीडच्या किल्ला मैदान येथून स्वतंत्र भारताच्या रणरागिनी रस्त्यावर उतरल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या ‘अन्याय करणार्‍यापेक्षा अन्याय सहन करणारा सर्वात मोठा गुन्हेगार असतो’ या मुलमंत्राला सोबत घेऊन शंभरात नाही, हजारात नाही तर लाखात महिलांनी एकत्रित येऊन केंद्र सरकारच्या धर्मांध भूमिकेविरुद्ध मोर्चा काढला. या मोर्चा काढला. या मोर्चात कुणाविरुद्ध ब्र शब्द नव्हता, मात्र तणात आणि मनात केेंद्र सरकारच्या भूमिकेविरोधात तेवढाच संताप उफळत होता. तो मोर्चेकर्‍यांच्या चेहर्‍यावर स्पष्टपणे दिसून येत होता. अनेक महिला मोर्चेकर्‍यांच्या हातामध्ये घोषणांचे फलक होते. अनेक महिला ज्या कधी घराबाहेर पडल्या नाहीत त्यांनी आज सत्य आणि न्यायाच्या तराजू समोरून जाताना आम्ही याच अखंड भारताच्या लेकी आहोत, अन्याय सहन करणार नाहीत, अन्याय करणार्‍याला अन्याय करू देणार नाहीत, या भूमिकेत आम्ही एकवटलो आहोत हे व्यवस्थेला दाखवून दिलं आणि थेट आपल्या मागण्यांचं राष्ट्रपतींना लिहिलेलं निवेदन पत्र जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांना दिलं.
देशाच्या राजकीय परिस्थितीमध्ये धर्मांधांची घूसखोरी झाली. जाणीवपुर्वक विशिष्ट समाजाला सत्ताधारी पोशाखावरून आणि टोपीवरून हिणवू लागले. दस्तुरखुद्द देशाचे पंतप्रधानही अशी भाषा करू लागले. त्यातून गेल्या पाच वर्षांच्या कालखंडात अल्पसंख्याक समाजावर प्रचंड अन्याय सुरू झाला. अनेक राज्यांमध्ये मदरशे तोडण्यात येऊ लागले, कधी पोशाखावरून तर कधी अन्य बाबींवरून सरेआम मुस्लिमांची कत्लेआम केली जाऊ लागली. बिल्कीस बानो बलात्कार प्रकरणातील आरोपीतांची शिक्षा माफ करण्यात आली. त्यापुढे जात भाजपासारख्या देशातल्या सर्वात मोठ्या पक्षाच्या आमदाराने संबंधित आरोपी हे विशिष्ट समाजाचे सुसंस्कृत आहेत, म्हणून शिक्षा माफ झाल्याची समर्थनार्थ प्रतिक्रिया दिली. या सर्व घडामोडी विशिष्ट समाजाला टार्गेट करणार्‍या आहेत. आज बीडमध्ये संविधान बचाव संघर्ष समितीच्या वतीने महिलांचा मुकमोर्चा काढण्यात आला. इतिहासाच्या पानामध्ये ज्यांनी दखल घेतली त्या किल्ला मैदानातून सत्य आणि न्यायाच्या मागण्यांसाठी हा मोर्चा निघाला. कारंजा मार्गे हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौकात आला तेव्हा मोर्चाचं खरं स्वरुप दिसून आलं. मोर्चातला पहिल्या रांगेतला माणूस हा बीडच्या न्यायालयासमोर होता. तर शेवटचा माणूस हा किल्ला मैदान येथे होता. यावरून सरकारच्या भूमिकेविरुद्ध आवाज उठवण्यासाठी मोर्चात सहभागी झालेल्या महिलांची संख्या किती हे दिसून येईल. अत्यंत शांततेत निघालेला हा मोर्चा कलेक्टर कचेरीवर धडकला तेव्हा तीन ते चार महिलांनी मोर्चेकर्‍यांना संबोधित केले. या वेळी या वक्तव्यांमध्ये मोर्चेकर्‍यांचं प्रतिनिधीत्व करताना सरकारविरुद्धचा संताप दिसून आला. बिल्कीस बानो प्रकरणातील आरोपींना पुन्हा शिक्षा करा, अनाधिकृत पाडले जाणारे मदरसे पाडणे बंद करून ते पुन्हा बांधा, मुस्लिमांवर होणार्‍या अन्याय-अत्याचारासह हल्ल्यांविरोधात अ‍ॅट्रासिटीसारखा कायदा करा, मौलाना कलीम सिद्दीकी यांच्यावरील खोटे आरोपी दूर करून त्यांना निर्दोश मुक्त करा, बलात्कार्‍यांना फाशी द्या, महिला सुरक्षेसाठी कठोर पावले उचला यासह अन्य मागण्यांचं थेट राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु यांना लिहिलेलं आपल्या मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आलं.

एसपी ठाकूर यांचं चोख नियोजन
महिला कॉन्स्टेबल यांचे कौतुक
आजच्या महत्वपुर्ण मोर्चात महिलांची संख्या ही हजारो-लाखात होती. मोर्चेकर्‍यांना त्रास होऊ नये, पादचार्‍यांसह वाहन धारकांना त्रास होऊ नये यासाठी जिल्हा पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांनी चोख नियोजन केल्याचे दिसून आले. पोलीस कॉन्स्टेबल, पोलीस अधिकारी यांची दूरदृष्टी व्यवस्थापनात खास करून पहावयास मिळाली. त्यापेक्षा अधिक बंदोबस्तावर असलेल्या महिला पोलीस कर्मचार्‍यांनी बंदोबस्त अत्यंत चोख ठेवून आपल्या कर्तव्याची चुणूक महिला पोलिसांनी दाखवून दिली, त्यांचे खास कौतुक

संविधान बचाव संघर्ष समितीचे कौतुक
मी, मला, माझं एवढच पाहण्याच्या स्पर्धेत आजचे लोक असताना अखंड समाजाचे प्रश्‍न समोर ठेवून न्याय-हक्कासाठी आवाज उठवण्या हेतु बीडमधील संविधान बचाव संघर्ष समितीने सर्वसामान्यांचा आवाज मुक मोर्चाच्या माध्यमातून देश आणि जागतिक पातळीवर जावा आणि ध्रत्र्ाष्ट्राच्या भूमिकेत असलेल्या सरकारला दृष्टी यावी या उद्देशाने आयोजीत केलेल्या मोर्चासाठी समितीतील लोक गेल्या पंधरा दिवसांपासून झटत होते. आजचे बीड आणि जिल्ह्यातील मोर्चे पाहता या समितीचं कौतुक करावं तेवढं थोडं.

मोर्चेकर्‍यांच्या रस्त्यावर पाणी आणि फळांची सोय
समाजावर होणार्‍या अन्याय-अत्याचाराविरोधात आवाज उठवण्याहेतु महिला आज घराबाहेर पडल्या. आपल्या छोट्या मोठ्या बाळांना सोबत घेऊन अनेक महिला मोर्चामध्ये दिसून आल्या. या वेळी मोर्चेकरी महिलांसाठी रस्त्यावर ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची, फ्रुटस्ची सोय लोकांनी उत्स्फूर्तपणे केली होती.

आंदोलनाचा समारोप दुवॉने
आंदोलक महिलांनी मूकमोर्चाचा समारोप दुपारी दीड वाजता दुवॉ मागून केला. विशिष्ट समाजाला
त्रास देण्या हेतू धर्मांधांच्या मस्तकात कुविचारा ऐवजी सुविचार यावेत, अखंड भारत हा अखंड भारतासारखा
राहावा, देशभरात सुख-शांती-सौख्य नांदावे, गरीब-श्रीमंत, जात-पात, भेद, भाव, छूत-अछूत
संपुष्टात यावे, देशात सर्वांनी गुण्यागोविंदाने राहावे, इथला प्रत्येक माणूस हा सुखी आणि समृद्ध
व्हावा यासाठी हजारो लाखो उपस्थित महिलांनी दुवॉ मागितली.

Previous Post

उस देश में लगता है अदालत नही होती, जिस देश में इन्सान की हिफाजत नही होती; अल्पसंख्यांकांवर होणार्‍या अन्यायाविरुद्ध उद्या महिलांचा मुकमोर्चा

Next Post

महिलांवर वाढत्या अन्याय विरोधात आष्टीत महिलांचा भव्य निषेध मोर्चा, हजारो महिला सहभागी

संबंधित बातम्या

अग्रलेख

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

by गणेश सावंत
June 26, 2026
कटाक्ष

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

by गणेश सावंत
June 24, 2026
केज

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

by गणेश सावंत
June 23, 2026
अंबाजोगाई

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

by गणेश सावंत
June 23, 2026
क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
Next Post
महिलांवर वाढत्या अन्याय विरोधात आष्टीत महिलांचा भव्य निषेध मोर्चा, हजारो महिला सहभागी

महिलांवर वाढत्या अन्याय विरोधात आष्टीत महिलांचा भव्य निषेध मोर्चा, हजारो महिला सहभागी

ताज्या बातम्या

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा
  • कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?