बीड (रिपोर्टर)- विशेष पोलिस महानिरिक्षक के.एम. मल्लिकार्जून हे आजपासून बीड जिल्हा पोलिस दलाचा वार्षिक आढावा घेणार आहेत. आज सकाळी १० ते रात्री १० पर्यंत ते पोलिसांची प्राथमिक चौकशी आढावा घेत आहेत.
बीड जिल्हा पोलिस दलाची विशेष पोलिस महानिरीक्षकांकडून वार्षिक तपासणी करण्यात येत आहे. आज ते प्राथमिक चौकशी आढावा घेणार आहेत. उद्या पोलिस अधीक्षक कार्यालयातील सर्व शाखांची तपासणी करणार आहेत तर परवा क्राईम मिटिंग आणि पोलिस कर्मचार्यांचा दरबार घेणार आहेत. आज ते पोलिसांच्या तक्रारी ऐकून घेणार आहेत. त्यासाठी ते सकाळपासूनच पोलिस अधीक्षक कार्यालयात तळ ठोकून आहेत.