Tuesday, May 17, 2022
No menu items!
Homeबीडभारतीय जनता पार्टीने महावितरण कार्यालयास टाळे ठोकले

भारतीय जनता पार्टीने महावितरण कार्यालयास टाळे ठोकले


किल्ले धारूर (रिपोर्टर) धारूर शहरात महावितरणच्या वतीने सुरू असलेल्या सत्तेच्या वीज बिल वसुली च्या विरोधात आज भारतीय जनता पार्टीने येथील महावितरणच्या मुख्य कार्यालयास टाळे ठोकले
महावितरणने शहरात तसेच तालुक्यात वीज बिल सक्तीने वसुली सुरू केली आहे लॉक डाऊन मध्ये वीज न वापरताही अव्वाच्या सव्वा वीज बिल देण्यात आले आहे त्याची दुरुस्ती देखील केलेली नाही असे असताना देखील कर्मचारी कुठलाही विचार न करता शहरात तसेच तालुक्यात सक्तीने वीज वसुली करत आहेत 
त्यामुळे येथील महावितरणच्या कार्यालयास आज भाजपाच्या प्रमुख पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी टाळे ठोकले ही टाळी ठोको आंदोलन भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य डॉक्टर स्‍वरूपसिंह हजारी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले
यावेळी जिल्हा परिषद सदस्य ओव्हाळ ,भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस तथा नगराध्यक्ष डॉक्टर स्‍वरूपसिंह हजारी , तालुका अध्यक्ष चोले , कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती महादेव बडे, उपनगराध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, ॲड मोहन भोसले ज्ञानोबा चोले नगरसेवक सुखाराम गायसमुद्रे व भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!