Friday, May 20, 2022
No menu items!
Homeक्राईमपुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणातील संशयित मंत्र्याचे व कार्यकर्त्याचे संभाषण व्हायरल

पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणातील संशयित मंत्र्याचे व कार्यकर्त्याचे संभाषण व्हायरल


मुंबई (रिपोर्टर):- पुणे शहरातील वानवडी परिसरात एका २२ वर्षीय तरुणीने इमारतीवरून उडी मारत आत्महत्या केल्याची घटना समोर आली होती. पूजा चव्हाण असं या तरूणीचं नाव होतं. सोशल मीडियावर ’टिक-टॉक स्टार’ अशी पूजाची ओळख होती. पूजाच्या आत्महत्या प्रकरणात राज्याच्या आघाडी सरकारमधील विदर्भातल्या एका बड्या मंत्र्याचं नाव समोर आल्यानं खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांचा धुरळा नुकताच खाली बसलेल्या असतांना आणखी मंत्री महिलेच्या प्रकरणात सापडल्याने सरकार अडचणीत येण्याची शक्यता आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात महाविकास आघाडी सरकारमधील एका मंत्र्याचं नाव समोर आल्यानं भारतीय जनता पक्ष आक्रमक झाला आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी सखोल चौकशीची व तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.

संबंधित मंत्री आणि पूजा यांच्यामध्ये मध्यस्थ असलेला एक कार्यकर्ता यांच्यातील संभाषणाचे कॉल रेकॉर्ड व्हायरल झाले आहेत. या कॉल रेकॉर्डनुसार पूजा ही गर्भवती असल्याचं समोर येत आहे. अर्थात या प्रकरणात सत्य काय आहे हे पोलिस तपासानंतरच समोर येणार आहे. मंत्री आणि तो कार्यकर्ता यांच्यात नेमकं काय संभाषण झालं. ते आम्ही जसंच्या तसं इथं देत आहोत. या संभाषणातील Aम्हणजे तो मंत्री आहे तर इ म्हणजे कार्यकर्ता आहे.
ब- (कार्यकर्ता) : हॅलो..
Aअ- (मंत्री) निघालो आता बाहेर.
ब-मी पण बाहेर होतो
Aअ- लग्नात होतो, तू त्याला समजव. असं बरोबर नाही ना यार. मी प्रॉब्लेममध्ये येईल. अगोदरच टेंन्शनमध्ये आहे. मी खूप परेशान आहे. घरगुती, इतर आणि आता हे टेन्शन. मुद्दाम आहे ह्या गोष्टी मग मला राग येतो. काय करणार आता डिस्टर्ब होतोय माणूस. समजव त्याला. मग येतो मी. तूच कन्वेंस करू शकतोस त्याला.
ब- चालू आहे
अ- फालतु आहे. आतापर्यंत काही विषयच नव्हता
ब- ठीक आहे. मला सांगाल, कारण विषय बरोबर नाही
अ-तेच तर म्हणजे एवढ्या दिवसापासून बोलणे चालू आहे, कधी काही विषय नाही
ब- दुपारी सांगितले पॉझिटिव्ह आहे आणि रडायला लागली. मी म्हटलं शांत राहा. रडून काय होणार. काहीतरी मार्ग काढू
अ-पहा कन्वेंस कर
ब- दिसायला लागलं की लपवता येत नाही. घरच्याला कळते.
अ-अरे पण मला समजत नाही. तिला काय माहीत नाही का? मुद्दामच केलं ना. प्रत्येक महिन्यात माहीत पडत नाही का? असंच जर केलं तर मग काय. मला तर मी सांगितलं येतो म्हणून नंतर
ब-ती ट्रीटमेंट दवाखाना इथं कुठं न्या लागेल. ती भलती सर्किट आहे हो सर. मागच्या वेळी ही मुंबई आली तेव्हा हात धरून तिला सांगितले की थांबून जा, राहून जा. तुझी जबाबदारी सरनी माझ्याकडे दिलेली आहे. तर ऐकलं नाही. एकदम सर्कीट आहे. मनानेच करते. एकही गोष्ट ऐकत नाही. त्यावेळी १२-१ वाजता गेली.
अ-ठीक आहे समजव तिला
ब-गोडी-गोडी न घ्या लागेल. चांगली गोष्ट नाही. कुणाला कळलं तर बदनामीचे धंदे.तुम्ही एकदा तिला बोला
अ- मी बोललो तिला सांगितले की कर म्हणून
ब- २ महिने झाले म्हणून सांगत होती. गोळ्याने होईल का? की ट्रीटमेंट घ्या लागेल
अ-नाही नाही होऊन जाते. त्याला सगळं माहीत आहे. एवढे नॉलेज आहे सर्व मग
ब-गोळ्याने झाले तर बरं, हॉस्पिटलमध्ये जाणे अवघड
अ-नाही बघ तू आता
ब-करतो. रडत होती. चिडचिड करत आहे
अ-तिला मी मागेच सांगितले सगळी साथ द्यायला तयार आहे. तुझं करियर कर काय करायची इच्छा आहे ते कर. तुझ्या सोबत प्रत्यक्ष जरी नसलो तरी सपोर्ट तर राहते ना. मग विनाकारण दुसर्‍यांचे ऐकत असेल तर मला किती प्रॉब्लेम आहे. मला माझं घर. मला माहीत मी एवढा डिस्टर्ब झालो. अगोदर तीन महिन्यापासून परेशान आहे. समजव तिला
ब- त्याच्या शिवाय पर्याय नाही बोलतो. पद्धतशीर शांतपणे समजून सांगतो. बाहेर गोष्टी बराबर नाही. ऊच् चे आताशी मिटले
अ- मला तर संन्यास घेऊन मरावेच लागेल. विचित्र आहे. सोडून दे
ब- नाही ती आहे सायको
अ-पण अशाने स्वभाव असा आहे म्हणून दुसरीकडे जात नेत आहे मी मागेच सांगितले
ब-पाहतो मी, बोलतो आज रात्री, विलासही आहे रूमवर. दुपारी आणून दिले होते, ती तिथेच बसली आहे रडत, डोक्यावर हात देऊन
अ- तिला अगोदरच माहीत होतं ना. काळजी घ्यायला पाहिजे अगोदरपासूनच. मुद्दाम केल्यासारख झालं ना
ब- नाही.अशात तीच दुखत पण होतं घरी होती. ऍडमिट वगैरे
अ- अरे बाबा तिला सगळं माहीतच आहे ना. मग काळजी घ्या लागेल ना
ब-मी विचारलं कधी पासून असं फिल होते म्हणून. २ दिवसापासून असं वाटते आहे म्हणे. मी किट आणली टेस्ट केली. तर दोन पट्‌ट्या दिसल्या. पॉझिटिव्ह आहे म्हणे. एकदम धडधड झालं. काय करावे नि काय नाही घामच सुटला. तो रूमवाला आला होता कालच. आधारकार्ड वगैरे घेतले आमचे. तिला समजवण्याशिवाय पर्याय नाही डोक्याच्या बाहेरचा विषय आहे कन्वेंस करा लागेल
अ-बघ कर
ब-बोलतो जातो रूमवर. बोलतो व्यवस्थित
अ-असे जर झाले तर मी एवढा दूर चालला जाईल की तिने स्वप्नात पण पाहिले नसेल. तिला सगळी साथ दिली आहे. तुला जे स्वप्न पूर्ण करायचे ते कर मी तुझ्या पाठीमागे आहे. आता ती गोष्ट दुसरीकडे नेत आहे.माझी प्रतिमा, समाजात मी एकटा आहे. एकतर मिळत नाही आपल्याला.
ब-सांगतो मी समजून ह्या गोष्टी बाहेर चांगल्या नसतात ना उचलायला. बोभाटा लगेच करतात लोक. मी आजच इथल्या इथे कन्वेंस करतो तिला रात्री. तुमचं बराबर आहे ना तुमचं रेप्युटेशन आहे. ते बरोबर नाही
अ-याचा अर्थ तिने मुद्दाम केलं. अगोदर तिला सगळं माहीत होतं. गोळ्या घेतो. चुकीचं केलं तिनं. मला विश्वास होता त्या विश्वासाला तडा जात आहे ना
ब-चूक होते पण काय करावे काही समजत नाही. चूक होतात, पण दाबाव्या ही लागतात. तुम्ही मामुली नाहीत, ती पण नामांकित आहे. बरोबर ना तिला सांगतो तिची इज्जत आहे. तुमचं बी रेप्युटेशन आहे.लोकांना विषय पाहिजे लहान गोष्टीचा. ऊच् चे कसे महाराष्ट्रभर केले
अ-असं झालं तर मला जीवच द्यावा लागेल
ब-नाही नाही तुम्हाला काही होऊ देत नाही, मी समजून सांगतो
अ-बघ मी तिला सांगितलं. करून घे. मी येतो दोन तीन दिवसात
ब-एकवेळ तुम्ही बोलून घ्या
अ-नाही नाही, मी काही बोलत नाही, तूच कर, तुच सांग. मी काही बोलत नाही झालं तरी सांग नाही झालं तरी सांग.मग मी ठरवतो.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!