Friday, May 20, 2022
No menu items!
Homeक्राईमपाच कुख्यात दरोडेखोरांच्या एलसीबीने आवळल्या मुसक्या

पाच कुख्यात दरोडेखोरांच्या एलसीबीने आवळल्या मुसक्या

बीड (रिपोर्टर):- पोलीस अधिक्षक राजारामा स्वामी यांनी फरार आरोपींच्या मुसक्या आवळण्याचे आदेश पोलीसांना दिले असून स्थानिक गुन्हे शाखा कुख्यात दरोडेखोरांच्या गेल्या काही दिवसापासून मागावर आहे. काल आणि परवा स्थानिक गुन्हे शाखेच्या विविध पथकाने पाच कुख्यात दरोडेखोरांना जेरबंद केले आहे.
काल ताब्यात घेतलेल्यांमध्ये शेख मझहर उर्फ काल्या उर्फ हाफ मर्डर शेख रहीम रा. बांगरनाला बीड, शेख बब्बर शेख युसुफ रा.खासबाग यांना काल पुणे आणि बनसारोळा केज येथून ताब्यात घेतले. त्यांच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या शिक्षकाच्या खूनाचा गुन्हा दाखल आहे. तिसरा आरोपी पिन्या बाळु भोसले रा.तेलगाव ता.माजलगाव जि.बीड याला ११ तारखेला सोनपेठ येथून ताब्यात घेतले. त्याच्या विरोधात युसुफवडगाव पोलीस ठाण्यात ३९५ चा गुन्हा दाखल आहे. चौथा आरोपी संपत आबासाहेब गवते रा.राजापुर ता.गेवराई याला पुण्यावरून पोलीसांनी अटक केली असून त्याच्या विरोधात तलवाडा पोलीस ठाण्यात ३९५ चा गुन्हा दाखल आहे. पाचवा आरोपी दिपक गौतम पवार, रा.टाकळीअंबड ता.पैठण याला काल पोलीसांनी ताब्यात घेतले असून त्याच्यावर जालना, औरंगाबाद,बीड येथे दरोडे, जबरी चोरी, खून, लुटमार यासारखे आकरा गुन्हे दाखल आहेत.

Most Popular

error: Content is protected !!