Tuesday, September 21, 2021
No menu items!
Homeक्राईममाहेरी आलेली महिला बेशुद्धावस्थेत सापडली

माहेरी आलेली महिला बेशुद्धावस्थेत सापडली

गेवराई (रिपोर्टर) कुंभेजवळगा येथील आपल्या माहेरून दोन दिवसांपुर्वी गायब झालेली एक महिला शुक्रवार दि.11 रोजी सकाळी तालुक्यातील कवडगाव शिवारात बेशुद्ध अवस्थेत सापडल्याने गावात एकच खळबळ उडाली.

या बाबत मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील कुंभेजळगाव येथील आपल्या आईच्या घरी रंजना अरविंद राठोड ( वय 26 ) या राहण्यासाठी आल्या होत्या परंतु दोन दिवसांपुर्वी रंजना राठोड या माहेरून गायब झाल्याने या प्रकरणी तात्काळ त्यांच्या आईने चकलंबा पोलीस ठाणे गाठून मिसिंगची नोंद केली होती. या प्रकरणी चकलांबा पोलिसांनी रंजना राठोड यांची सर्वत्र शोधाशोध केली असता. शुक्रवार दि.11 रोजी रंजना राठोड ही कवडगाव शिवारात बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्या असून त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा प्रकार कशामुळे झाला याचा तपास पोलिस करीत आहेत.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!